Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

New Year Celebration: श्‍वानपथके, ड्रोनसह 3 हजार पोलिस तैनात; 'नववर्ष’ स्वागतासाठी गोवा सज्ज

Goa Police: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील किनारपट्टी तसेच इतर भागांत मोठ्या प्रमाणात पार्ट्या तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published on

Goa year-end celebrations police deployment

पणजी: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील किनारपट्टी तसेच इतर भागांत मोठ्या प्रमाणात पार्ट्या तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी गोवा पोलिस दल सज्ज झाले आहेत.

१२ श्वानपथकांसह गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सुमारे ३ हजार पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जागोजागी तैनात असतील, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्‍यक त्या प्रमाणात पोलिस कर्मचारी तसेच ड्रग्स तस्करांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांसह तीन श्वानपथकांचा वापर करण्यात येणार आहे.

किनारी परिसरासह रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठा तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी दिवसा तसेच रात्रीही नाकाबंदी केली जाणार आहे. मद्यपी चालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बंदोबस्तासाठी गोवा पोलिसांनी भारतीय रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) यांच्यासह सुमारे २ हजार पोलिस व इतर विभागांतील कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, तसेच १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिकेचे कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणेचे सुमारे ५०० कर्मचारी तैनात केले आहेत.

जुने गोवे येथे कडक बंदोबस्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात येतात. तसेच जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर शवप्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचीही संख्या वाढल्याने जुने गोवे येथील पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. शवप्रदर्शन जानेवारीच्या पहिल्या आठवड्याभरापर्यंत सुरू राहणार असल्याने भाविक तसेच पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही वाढ केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Goa Police
Goa Police: "काही कुजक्या फळांमुळे सर्वच बदमान होतायत" डीजीपींकडून पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेवर खेद व्यक्त

किनारी भागात वाहतुकीवर निर्बंध

किनारपट्टी भागात जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नो पार्किंग’ झोन जाहीर केले आहेत. त्यासंबंधीचा आदेशही जारी केला आहे. याशिवाय २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत खासगी प्रवासी बस वगळता इतर अवजड वाहनांना किनारी भागात ‘नो एंट्री’सह एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

Goa Police
Goa Police: 55 पोलिस कर्मचाऱ्यांना डीजीपी इन्सिग्निया पुरस्कार! स्थापनादिनानिमित्त मुख्यालयात रंगला कार्यक्रम

संशयास्पद व्यक्तींवर नजर

अमली पदार्थ विरोधी पथक ठोस पावले उचलली आहेत. ड्रग्सविरोधी पथक, श्वान पथकांसह ड्रग्स डिटेक्शन किटचा वापर करण्यात येणार आहे. संशयास्पद व्यक्तींचीही घटनास्थळी तपासणी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com