Ponda Traffic Police: फोंड्यात 2,623 जणांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार? 23,975 जणांकडून वाहतूक नियमांचा भंग

एकूण 1.45 कोटी रूपये दंड वसूल
Goa Traffic Police | File photo
Goa Traffic Police | File photoDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Traffic Police: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत फोंडा वाहतूक पोलिसांनी मे महिन्यापर्यंत एकूण 23,975 गुन्हे दाखल केले असून एकूण 1.45 कोटी दंड वसूल केला आहे.

Goa Traffic Police | File photo
Goa Monsoon: चिंताजनक! गोव्यात जूनमध्ये केवळ 6.8 इंच पाऊस

यामध्ये हेल्मेटशिवाय गाडी चालवण्याची 1360 प्रकरणे आहेत. धोकादायक पार्किंगची 3317 प्रकरणे, टिंटेड काच वापरण्याची 2530 प्रकरणे, सीट बेल्ट न लावता वाहन चालवण्याची 145 प्रकरणे, लेन कटिंगची 2228 प्रकरणे, नो एन्ट्री उल्लंघनाची 3900 प्रकरणे, ओव्हरस्पीडींगची 1,400 हून अधिक प्रकरणे इत्यांदींचा समावेश आहे.

सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड किमान 500 रूपये ते कमाल 10,000 रूपयांपर्यंत आहे.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत दाखल झालेल्या एकूण प्रकरणांपैकी पोलिसांनी 2,623 ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनासाठी पाठवले आहेत. जे ADT द्वारे किमान तीन महिन्यांसाठी निलंबित केले जातील.

त्यात ओव्हर स्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, दारू पिऊन दारू चालवणे अशा प्रकरणांचा समावेश आहे

Goa Traffic Police | File photo
Goa Petrol-Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी गोव्यातील पेट्रोल-डीझेल दर स्थिर; जाणून घ्या आजचे दर

सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला जातो आणि त्यांचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येतो. असे 1,360 गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवण्याची 4,000 प्रकरणे नोंदवली गेली होती. दंडात वाढ झाल्यानंतर लोकांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केल्यामुळे ही घट झाल्याचेही सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com