Drishti Lifeguard Goa
Drishti Lifeguard GoaDainik Gomantak

Drishti Lifesavers Rescue : आठवड्याभरात दृष्टी जीवरक्षकांकडून पाच जणांना जीवदान

राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर बचावकार्य
Published on

Drishti Lifeguard : गोव्याच्या समुद्रात बुडताना पाच जणांना वाचवण्यात आले असून यात एका रशियन महिलेचा समावेश आहे. राज्यात मोठ्या संख्येत पर्यटक येत असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याची सूचना देऊनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या घटना घडत आहेत.

तरीदेखील दृष्टी जीवरक्षकांच्या उत्तम कामगिरीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर अनेकांचे प्राण वाचविले जात आहेत. 28 वर्षीय रशियन महिला उत्तर गोव्यातील केरी समुद्रकिनारी पोहत असताना लाट आदळल्याने तिचा तोल गेल्याने तिचा हात निखळला.

Drishti Lifeguard Goa
Varca Panchayat : वार्का पंचायत सचिवांवर कारवाईची पंचांची मागणी

दृष्टी जीवरक्षकाने तिची अडचण लक्षात घेतली आणि तिला सुखरूप परत किनाऱ्यावर आणून वैद्यकीय मदत करण्यासाठी आपत्कालीन सेवा येण्यापूर्वी तिला प्रथमोपचार दिला. अन्य घटनेत महाराष्ट्रातील नाशिक येथील एक 26 वर्षीय व्यक्ती आश्‍वे समुद्रात बुडताना मदतीसाठी ओरडला, ज्याने किनाऱ्‍यावर तैनात जीवरक्षकाचे लक्ष वेधले. त्या माणसाला रेस्क्यू ट्यूबच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणण्यात आले.

बंगळुरू येथील 33 वर्षे वयाच्या एका महिलेला आठवड्याच्या शेवटी तळपण समुद्रकिनाऱ्यावर वाचवण्यात आले. दृष्टीच्या जीवरक्षकाने तिला रेस्क्यू बोर्ड लावून किनाऱ्यावर येण्यास मदत केली. दृष्टी जीवरक्षकांनी म्हापसा आणि मडगाव येथील दोन स्थानिक रहिवाशांना वाचविले जे अनुक्रमे वागातोर आणि काब दी राम येथेही अशाच जोरदार प्रवाहात अडकले होते.

Drishti Lifeguard Goa
Tourist Places In India: भारतीयांची गोव्यालाच पसंती; फिरायला जाण्यासाठी देशातील लोक काय सर्च करताहेत?

मुंबईतील एका महिलेने दृष्टी जीवरक्षक टॉवरशी संपर्क साधला आणि त्यांना कळवले की तिचा नवरा बेपत्ता आहे. ती तिच्या फोनद्वारे त्याच्याशी संपर्क करू शकत नाही. समुद्रकिनारी उभ्या असलेल्या जीपच्या मदतीने झटपट शोध घेण्यात आला.

काणकोणात सर्वाधिक घटना

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या 14 महिन्यांत जल क्रीडा संबंधित 16 अपघातांची नोंद झाली आहे. सर्वाधिक 7 घटना काणकोण येथील पाळेळे समुद्रकिनाऱ्यावर, तर आकडेवारीनुसार अपघातांमध्ये जखमी झालेल्या सर्वाधिक व्यक्ती 26 ते 35 वयोगटातील असून बोट राईड, बनाना बोट राईड, पॅराग्लायडिंग आणि कयाकिंग या जलक्रीडा उपक्रमांमध्ये अपघातांची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com