DRDO च्या चेअरमनपदी डॉ. समीर कामत यांची नियुक्ती

DRDO Chief: नामवंत शास्त्रज्ञ समीर वेंकटपथी कामत यांची‘डीआरडीओ’च्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली
Dr. Samir V.Kamat
Dr. Samir V.KamatDainik Gomantak
Published on
Updated on

DRDO Chief: नामवंत शास्त्रज्ञ समीर वेंकटपथी कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास खात्याचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे डीआरडीओ (DRDO) चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीची आदेश केंद्रीय कार्मिक मंत्रालयातर्फे नुकताच जारी करण्यात आला.

Dr. Samir V.Kamat
'शब्दभेदी' करणार महासागराचे रक्षण, Navy ला मिळाली नवी ताकद

पदोन्नत्तीआधी समीर कामत डीआरडीओतच नौदल यंत्रणा आणि साधनसामग्री विभागाचे सरसंचालक म्हणून कार्यरत होते. डिआरडीओचे मावळते चेअरमन डी सतीश रेड्डी यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. रेड्डी यांना संरक्षण मंत्र्यांचे वीज्ञानविषयक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, खरगपूर येथील आयआयटीचे धासुशास्त्र मेटालर्जीकल (Metallurgical) अभियंता असलेले कामत अमेरिकेतील ओहायो विद्यापिठातून मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयातून पी. एचडी. संपाद केल्यानंतर 1989 साली डिआरडीओत रुजू झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com