पणजी: मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पक्षाचा सल्ला दुर्लक्षित केला. त्यामुळे आता फ्रंटलाइन कोरोना योद्धा आणि रुग्णांना हाल सोसावे लागत आहेत. त्यांची स्थिती समजण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फक्त एक दिवसासाठी कोविड डॉक्टरांच्या (covid Doctor) हाताखाली स्वयंसेवक म्हणून काम करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाने केले आहे. (Dr. Pramod Sawant should work as a volunteer under covid Doctor)
कोरोना फ्रंटलाइन योद्ध्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि त्यांना निराशेच्या मार्गावर नेल्याबद्दल सरकारवर आम आदमी पक्षाने टीका केली आहे. पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आणि माजी शासकीय आरोग्य अधिकारी डॉ. मारियानो गुदिन्हो यांनी नमूद केले, की आता सरकारच्या उदासीनतेमुळे डॉक्टर आणि रुग्ण दोघांचेही प्रचंड हाल होत आहेत. डॉक्टरांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी सरकारने नोडल अधिकारी नेमले पाहिजेत, अशी मागणी १० दिवसांपूर्वी आपने केली होती. ती मान्य न केल्यामुळे गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (Association of Residents Doctor) संघटनेला पत्र लिहून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधावे लागले आहे.
वैद्यकीय प्राणवायूच्या (oxygen) कमतरतेमुळे आधीच कित्येक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास दौरे करण्याची किंवा प्राणवायू निर्मिती प्रकल्पांना भेट देऊन फोटोसेशन करण्याची गरज नाही, तर त्याऐवजी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बसून वस्तुस्थितीचा आढावा घेऊन मुख्य उपाययोजनांवर काम करणे गरजेचे आहे व कुठल्याही महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी नोकरशाहीच्या लाल फितीत अडकणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
डॉ. गुदिन्हो म्हणाले की, मुख्यमंत्री स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी गोमेकॉ कोविड वॉर्डमध्ये केवळ एका दिवसासाठी स्वयंसेवक (volunteer) म्हणून काम केले पाहिजे. सध्याच्या गंभीर प्रश्नांचे निराकरण करण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री मात्र आर्थिक निधीचा मुद्दा उपस्थित करतात, हे असंवेदनशील आहे. सरकारने त्वरित एमबीबीएस (MBBS) पदवीधरांकांना एक वर्षाची इंटर्नशिप म्हणून भरती करावे, जेणे करून सध्याच्या डॉक्टरांवर मर्यादेपेक्षा जास्त ताण पडला आहे तो काहीसा कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.