Margao News : ग्रामीण जीवन साहित्‍यात उतरावे; डाॅ. प्रकाश पर्येकर

Margao News : वंचितांच्‍या व्‍यथा प्रभावीपणे लोकांसमोर याव्यात
Dr praksh parienkar
Dr praksh parienkarDainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

Margao News : मडगाव, गोव्‍याचे ग्रामीण जीवन आणि या जीवनातील मनाला भिडणाऱ्या व्‍यथा अजूनही खऱ्या अर्थाने कोकणी साहित्‍यात आलेल्‍या नाहीत. गोव्‍यातील या धगधगत्‍या ग्रामीण जीवनाला अजूनही प्रभावी स्‍पर्श होण्‍याची गरज आहे.

गोव्‍यातील ग्रामीण व्‍यथा इतर भाषेतील साहित्‍यात जाण्‍याची नितांत गरज आहे, असे मत यंदाचे साहित्‍य अकादमी पुरस्‍कार विजेते डाॅ. प्रकाश पर्येकर यांनी मांडले.

त्‍यांच्‍या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला यंदाचा साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. त्‍यासंदर्भात त्‍यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्‍हणाले, गोव्‍यातील ग्रामीण कथेला मिळालेला हा पुरस्‍कार, असे मला वाटते.

गोव्‍यातील ग्रामीण भागात जे कथानक आहे त्‍याला ज्‍या तऱ्हेने स्‍पर्श होणे आवश्‍‍यक होता, तसा अजून झालेलाच नाही. अशा परिस्‍थितीत माझ्‍या या कथासंग्रहाला हा पुरस्‍कार प्राप्‍त झाल्‍याने गोव्‍यातील ग्रामीण जीवन अधिक चांगल्‍याप्रमाणे देशातील इतर भागात पोहोचूशकेल, याचाच मला जास्‍त आनंद आहे.

डॉ. प्रकाश पर्येकर यांचा जन्‍म सत्तरी तालुक्‍यातील ‘धावेतार’ या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नदीवरून पाणी आणणे, भांडी घासणे, भात कांडणे, स्‍वयंपाक करणे अशी कामे करून पुढे आलेल्‍या पर्येकर यांना त्‍यांच्‍या या कामांमुळे लहानपणापासून ग्रामीण भागातील व्‍यथा काय, याची जाणीव झाली.

त्‍यामुळेच ग्रामीण व्‍यथा त्‍यांच्‍या साहित्‍यातून प्रभावीपणे व्‍यक्‍त होत आहेत. सत्तरी भागातील धनगर समाजाला सोसाव्‍या लागणाऱ्या हालअपेष्‍टा, गोव्‍यात अजूनही हरिजनांना दिली जाणारी हिन वागणूक, वानरमाऱ्यांसारख्‍या भटक्‍या जमातींना सोसावे लागणारे त्रास, अशी अनेक कथानके त्‍यांच्‍या कथांतून आतापर्यंत व्‍यक्‍त झाली आहेत.

हरिजनांच्‍या प्रश्‍नांवर त्‍यांनी लिहिलेल्‍या ‘काजरो’ या कथेवर आधारित चित्रपटाला त्‍यामुळेच राष्‍ट्रीय स्‍वरूपाचा पुरस्‍कार प्राप्‍त झाला. पर्येकर हे लोकांचे जीवन प्रभावीपणे मांडणारे लेखक आहेत.

Dr praksh parienkar
Goa Crime News: शिवोलीत बांधकाम साईटवर महिलेचा मृतदेह सापडला; पोलिसांकडून तपास सुरु | Gomantak TV

अस्‍सल ग्रामीण साज...

डॉ. प्रकाश पर्येकर यांचे साहित्‍य म्‍हणजे ग्रामीण भागातील धगधगत्‍या वेदनांना फोडलेली वाचा. त्‍यांच्‍या साहित्‍यातून गोव्‍यातला ग्रामीण भाग प्रभावीपणे पुढे येतो. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या कथा या वेगळ्‍या आणि उच्‍च दर्जाच्‍या ठरतात, असे मत कोकणी साहित्यिक आणि समीक्षक सखाराम बोरकर यांनी व्‍यक्‍त केले.

डॉ. पर्येकर यांनी आपल्‍या साहित्‍यातून ग्रामीण भागातील अनेक व्‍यथांना वाचा फोडली आहे. म्‍हादईवर होणारा आघात त्‍यांनी आपल्‍या साहित्‍यातून प्रभावीपणे लोकांसमोर आणला. डॉ. पर्येकर हे नवीन पिढीतील अत्‍यंत दर्जेदार असे कथाकार असून त्‍यांच्‍या कथासंग्रहाला मिळालेला हा पुरस्‍कार म्‍हणजे गोव्‍यातील ग्रामीण साहित्‍याचा सन्‍मान, असे मत बोरकर यांनी व्‍यक्‍त केले.

कोकणी ग्रामीण जीवन जेव्‍हा साहित्‍यरूपाने प्रभावीपणे जगापुढे येईल, त्‍यावेळीच गोवा म्‍हणजे नेमका काय, याची प्रचीती जगाला येऊ शकते. हे कोकणी ग्रामीण साहित्‍य कोकणी कथांपुरतेच मर्यादित न राहता कादंबरी स्‍वरूपात व्‍यापक अशा मोठ्या कॅनव्हासवर येणे गरजेचे आहे. गोव्‍यातील साहित्यिकांनी आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण खरा गोवा या ग्रामीण भागातच लपलेला आहे.

- डाॅ. प्रकाश पर्येकर, साहित्यिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com