1st Manohar Parrikar Yuva Scientist Award
1st Manohar Parrikar Yuva Scientist AwardCM Sawant Twitter

पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर, चांद्रयान-3 साठी योगदान दिलेले शास्त्रज्ञ ठरले विजेते

पुरस्कारासाठी एकूण 106 जणांनी अर्ज केले होते.
Published on

1st Manohar Parrikar Yuva Scientist Award: पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. युवा शास्त्रज्ञ निवडीच्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी याबाबतचा निकाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द केला.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरलेल्या चांद्रयान-3 मोहिमेची प्रक्षेपण रचना करणाऱ्या वैज्ञानिकाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

यू आर राव सेटलाइट सेंटरचे डॉ. मथवराज एस यांना गोवा राज्य सरकारतर्फे दिला जाणारा पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पुरस्कारासाठी एकूण 106 जणांनी अर्ज केले होते.

या पुरस्कारामध्ये 5 लाख रुपये आणि सन्मानपत्र आहे, जे सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्वोच्च रोख पारितोषिक आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथे 13 डिसेंबर 2023 रोजी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात, डॉ. मनोहर पर्रीकर (भाई) यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com