Bicholim News: महिलांनी वेळप्रसंगी दुर्गा बनावे : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News: 'नवरंग'च्या विजेत्या महिलांना बक्षीसे वितरित
MLA chandrakant shetye
MLA chandrakant shetyeDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली, महिलांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे. सुखी आणि यशस्वी जीवनासाठी गरज पडली तर दुर्गेचा अवतार धारण करावा, असे आवाहन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले.

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर सहनशीलता आणि प्रयत्नांबरोबरच अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा. असेही ते म्हणाले.

''नवरंग'' स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार डॉ. शेट्ये बोलत होते. मुळगाव येथे शनिवारी (ता.४) आयोजित या सोहळ्याला पतंजली योग समितीच्या महिला विभाग अध्यक्ष संध्या खानोलकर, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला पळ आणि कार्यक्रम समन्वयक प्रियांका शिरोडकर आदी उपस्थित होते.

MLA chandrakant shetye
Russian Women Molested In Goa: दिल्लीच्या बिझनेस पार्टनरने केला घात, गोव्यात रशियन महिलेचा विनयभंग

आपण सक्षम आहोत, असा जर सकारात्मक विचार महिलांनी केला तर यश निश्चित आहे. तसेच घरसंसार सांभाळताना महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन संध्या खानोलकर यांनी केले. विश्वास गावकर यांनी महिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत, असे आवाहन केले.

ॲड.शुभा दीक्षित यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन मनस्वी काजारी व शिवानी तेली यांनी केले.

स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

''नवरंग'' अंतर्गत महिलांसाठी ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या या स्पर्धेला महिला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वेगवेगळ्या गटात मिळून जवळपास ४५० महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेसाठी एकूण ८०० हून अधिक महिलांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या.

शिक्षा व्हीजन, डिचोली आणि भाजप युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी खास ही स्पर्धा भरविण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com