Calangute : राष्ट्रवादाच्या नावाखाली दहशत पसरविणाऱ्यांची गय नकोच!

गोव्याला वाचवाः कळंगुट प्रकरणात 'गोमन्तक'च्या भूमिकेचे स्वागत
video
video Dainik Gomantak

Calangute : कट्टर राष्ट्रवादाचे प्रदर्शन करीत झुंडशाहीने काहीजणांना गुडघे टेकून माफी मागायला लावण्याच्या प्रकाराची दखल आज प्रागतिक विचारवंतांनी घेतली. या प्रकारावर ‘गोमन्तक’ने खंबीर भूमिका घेतल्याबद्दल अनेक स्तरातून ‘गोमन्तक’चे अभिनंदन करताना अशा प्रवृत्तींना आताच ठेचून काढले पाहिजे, असे मतही व्यक्त केले.

माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी विचारांचे नेते अशी प्रतिमा असलेले शंभू भाऊ बांदेकर यांनी या बाबतीत ‘गोमन्तक’ने कणखर भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन करताना अशा अनिष्ट प्रथा बंद करुन गोव्याला वाचवा, असे सरकारला आवाहन केले आहे.

अन्यथा गोव्याचा बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

video
यापूर्वीही न्यायालयाने फिरविले आहेत सभापतींचे काही निर्णय

बांदेकर यांनी ‘गोमन्तक’ला जे पत्र पाठविले त्यात ते म्हणतात, नुकतीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘गोवा योगभूमी बनवू’ अशी जी घोषणा केली, ती स्तुत्य आहे. मात्र गोव्यात अनिष्ट प्रकार होत आहेत आणि त्यामुळे गोवा भोगभूमी होण्याच्या वाटेवर आहे, ते रोखा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

खुलेआम चालणारा ड्रग्स व्यवसाय, वेश्या व्यवसाय, गोंगाट करणाऱ्या पार्ट्या, हे वाढत असताना त्यात ओंगळवाण्या राष्ट्रवादाची भर नको, असे त्यांनी म्हटले आहे.

धर्मांधतेला थारा नाही!

गोवा आयटकचे अध्यक्ष प्रसन्न उटगी म्हणाले, अशा अतिरेकी विचारांच्या प्रवृत्तींना आताच ठेचून काढले पाहिजे. पोलिसांनी त्यांच्यावर अजून कारवाई कशी केली नाही. गोवा हे धार्मिक सहिष्णुता मानणारे राज्य असे मानले जाते, त्यात या धर्मांधतेला थारा नाही. प्रशासनाने अशा गोष्टींकडे डोळेझाक करता कामा नये.

video
CM Pramod Sawant : कळंगुट प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

विचारवंतांनी आवाज उठवावा

गांधी विचारांचा पुरस्कार करणारे मडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुकूल पै रायतुरकर म्हणाले, सध्या संपूर्ण देशात धार्मिक मुद्द्यांवर विघटन करण्यावर हेतूपुरस्सररित्या प्रयत्न होत आहे. कळंगुट येथे आता जी घटना घडली, तो त्याचाच परिपाक आहे. अशा गोष्टी समाजासाठी घातक आहेत.

धार्मिक विघटन या मुद्यावर भर देऊन सत्ता काबीज करणे आणि ती राखून ठेवणे ही सध्याची राजनीती आहे. ती हेतूपुरस्सररीत्या सगळीकडे पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र या अशा गोष्टी विरोधात विचारवंतांनी आवाज उठविलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यथा राजा, तथा प्रजा

सामाजिक प्रश्नांवरील भाष्यकार असलेले ॲड. क्लिओफात कुतिन्हो आल्मेदा यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, यथा राजा तथा प्रजा असे म्हटले. बहुतेक लोक सत्ताधारी पक्षाच्याच विचारसरणीला जवळ जात असतात आणि प्रशासनही तीच बाजू घेते.

खरे तर असे प्रकार बंद व्हावेत यासाठी पोलिसांनी योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. पण आमचे पोलीस अशा गोष्टीवर नियंत्रण आणण्याचे सोडून ‘म्हादई’साठी काढलेली यात्रा रोखण्यास धन्यता मानतात, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com