दोना पावला जेटी विक्रेत्यांनी दुकानाच्या जागेवर दर्शवली नाराजी

सरकारने पुन्हा पत्र्याच्या शेड बांधणे म्हणजे हा आम्हाला येथून हटवण्याचा एक डाव आहे; विक्रेत्यांचा आरोप
Dona Paula
Dona PaulaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोना पावला जेटी पॉईंट येथील स्थानिक विक्रेत्यांच्या पुनर्स्थापनेसाठी नव्याने बांधण्यात अलेल्या दुकानाच्या जागांबद्दल विक्रेत्यांनी नाराजी दर्शवली आहे . एका विक्रेत्याने दिलेल्या माहिती नुसार, ते या व्यवसायात 25 वर्षांहून अधिक काळ आहेत. (Dona Paula jetty vendors showed displeasure at shop premises)

Dona Paula
साल नदीतील गाळ काढण्यास पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

ते म्हणाले, “दिलेल्या जागेवर काँक्रीटचा वापर करण्याऐवजी, सरकारने पत्र्याचे बॉक्स बसवले आहेत, तौक्ते चक्रीवादळादरम्यान (Toukte Cyclone) या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याची पुर्ण कल्पना असुन देखील सरकारने पुन्हा पत्र्याच्या शेड बांधणे म्हणजे हा आम्हाला येथून हटवण्याचा एक डाव आहे," असा आरोप त्यांनी केला. दुकानाचे विक्रेते म्हणाले, ते पुढे म्हणाले "सरकारने दुकाने बांधली आहेत, परंतु त्याचे अद्याप वाटप झाले नाही".

या मुद्द्यवर कॉर्पोरेशन ऑफ पणजी (Panjim) चे नगरसेवक नेल्सन काब्राल म्हणाले की, गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक विक्रेत्याला पाच मीटर जागा मंजूर केली आहे, मात्र प्रत्येक नवीन बांधलेल्या दुकानाला दिलेली जागा ही त्यापेक्षा खूप कमी आहे.

सीसीपीने आधीच सरकारला (Goa Government) पत्र लिहून दुकान मालकांना स्टॉल्सचा ताबा देण्यास सांगितले आहे. जोपर्यंत सरकार सीसीपीला ताबा देत नाही तोपर्यंत नागरी संस्था विक्रेत्यांना नवीन दुकाने देऊ शकत नाही,” अशी माहिती काब्राल यांनी दिली. 54 नोंदणीकृत विक्रेत्यांना वाटप करण्यासाठी एकूण 54 दुकाने बांधण्यात आली आहेत तर या परिसरात सुरू असलेली इतर 10 दुकाने ही नोंदणीकृत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com