प्रसिद्ध दोनापावला जेटी पूर्णत्वाकडे

कामासाठी सुमारे 14 कोटी, 58 लाख 10 हजार 142 रुपये इतका खर्च
Dona Paula jetty
Dona Paula jettydainikgomantak
Published on
Updated on

पणजी : आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असणाऱ्या गोव्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेली ‘दोनापावला जेटी’ पुन्हा एकदा पर्यटकांच्या मनात आपला ठसा उमटवणार आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून दुरुस्तीकामासाठी बंद असलेली ही जेटी पर्यटकांना आनंद देण्यासाठी दिमाखात सज्ज झाली आहे. आता काम पूर्णत्वाकडे आले आहे. या कामासाठी सुमारे 14 कोटी, 58 लाख 10 हजार 142 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.

पर्यटन विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक निखिल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोनापावला जेटी ऊन, पाऊस, वारा यामुळे मोडकळीस आली होती. हे लक्षात घेऊन पर्यटन विकास महामंडळाने संपूर्ण जेटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, कामातील तांत्रिक बाबींमुळे हे काम रखडले होते. दोनापावला जेटी, जेटीला जोडणारा पूल आणि पार्किंग अशा तीन भागांमध्ये हे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. जेटीला जोडणारा पूल नव्याने उभारला असून, त्यावर बगल कठडे, टेकडीवरचा व्हू पॉईंटचा पॅरागोल, बसण्यासाठीचे कठडे, परिसराचे सौंदर्यीकरण, टेकडीवरील पुतळ्यांची दुरुस्ती हे काम आता पूर्ण झाले आहे.

Dona Paula jetty
गोव्यात 32 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

पार्किंगसाठी विशेष सोय

स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत, किनारी भागाच्या विकास योजनेमार्फत या प्रकल्पाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. याशिवाय दोनापावला सर्कलजवळ स्वतंत्र पार्किंग यंत्रणा उभी केली असून, यापुढे पर्यटकांची वाहने जेटीवरती न जाता पार्किंग स्लॉटमध्ये उभी केली जातील आणि तिथून शटल सर्व्हिसमार्फत पर्यटकांना जेटीवर नेण्यात येईल. यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.

कपडे व इतर वस्तूंचे छोटे व्यावसायिक, शीतपेय आदी व्यावसायिकांसाठी दोनापावला जेटीवर जाणाऱ्या पुलावर स्वतंत्र जागा देण्यात येणार आहे. यासाठी पूर्वीपासून दुकाने असलेल्या स्थानिक व्यावसायिकांचा प्रथम विचार करण्यात आला आहे.

दोनापावला परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुलभ प्रसाधनगृह उभारण्यात येत आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटक माहिती केंद्र तसेच पर्यटकांना जेटीवर येण्या-जाण्यासाठी खास सुविधा आदींचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com