Goa News: भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करुन रशियन पर्यटकाचा घेतला चावा; दूधसागर येथे बापलेकाला जीवदान

Drishti Marine lifesavers: बेलारूस येथील ३८ वर्षीय महिला आणि रशियातील ४० वर्षीय महिला अनुक्रमे कळंगुट आणि मांद्रे येथील रिप करंटमध्ये अडकून पडल्या होत्या.
Goa News: भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करुन रशियन पर्यटकाचा घेतला चावा; दूधसागर येथे बापलेकाला जीवदान
Stray Dogs On Goa Beachcanava
Published on
Updated on

पणजी: पाठलाग करुन रशियन पर्यटकाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. मोबोर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या या नागरिकाचा तीन भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. त्यानंतर चावा घेतल्याची घटना शनिवारी (०४ डिसेंबर) घडली. दृष्टी मरिन जीवरक्षकांनी पर्यटकाला प्रथमोपचार देऊन पुढील उपचार घेण्याचा सल्ला पर्यटकाला दिला.

दृष्टी मरिन जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ताळगाव येथील २३ वर्षीय महिलेला स्टींग रे माशाने चावा घेतल्याची घटना वेळसाव समुद्रकिनाऱ्यावर उघडकीस आली होती. महिलेच्या उजव्या पायावर माशाने चावा घेतला होता. जीवरक्षकांनी महिलेला प्रथमोपचार दिल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दूधसागर येथे पर्यटनासाठी गेलेला एक लहान मुलगा धबधब्याजवळ गेला असता घाबरला. त्याने मदतीसाठी वडिलांना हाक मारली. वडिलांनी लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात उडी घेतली आणि ते स्वत:च बुडू लागले. दरम्यान, दृष्टीच्या जीवरक्षकांनी संबधित व्यक्तीला आणि मुलाला सुखरुप बाहेर काढले.

Goa News: भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करुन रशियन पर्यटकाचा घेतला चावा; दूधसागर येथे बापलेकाला जीवदान
Shirgao: शेती, जलस्रोत वाचवा; 'खाण'प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर शिरगावमधील ग्रामस्थांची मागणी

बेलारूस येथील ३८ वर्षीय महिला आणि रशियातील ४० वर्षीय महिला अनुक्रमे कळंगुट आणि मांद्रे येथील रिप करंटमध्ये अडकून पडल्या. जीवरक्षकांनी दोन्ही महिलांना सुखरुप बाहेर काढले. तसेच, बागा येथे ३९ वर्षीय रशियन पर्यटकाला देखील जीवरक्षकांनी सुखरुप रेस्क्यू केले.

तसेच, बागा समुद्रकिनारी बेपत्ता झालेल्या राजस्थानच्या सात वर्षीय मुलाची त्याच्या पालकांसोबत पुर्नभेट घडवून आणली. या शिवाय दुसऱ्या एका घटनेत कळंगुट येथे आई-वडिलांपासून बेपत्ता झालेल्या तीन वर्षीय मुलाची त्याच्या कुटुंबियांसोबत भेट घडवून आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com