Goa Politics: लोबोंना काँग्रेसमध्ये घेऊ नका, असे आधीच सांगितले होते!

कॉंग्रेसचे उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी असे परखड मत व्यक्त केले.
Vijay Bhike
Vijay BhikeDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa: काँग्रेसमध्ये आयात आमदारांसह मायकल लोबो यांना प्रवेश देऊ नका, असे आधीच सांगितले होते. या आमदारांना पक्षात स्थान दिले, ही चूक आम्ही मान्य केली पाहिजे, असे परखड मत कॉंग्रेसचे उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी व्यक्त केले.

काल शनिवारी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतुल नाईक, सचिन किटलेकर उपस्थित होते. 2012 साली फॅमिलीराजला पाठिंबा दिला असता, लोकांनी त्यांना नाकारले. त्यानंतर 2017 मध्ये काँग्रेसने नवीन चेहरे देताच पक्षाचे 17 आमदार निवडून आले. पण सध्या भाजपकडे नेतेच नसल्याने ते दुसऱ्यांचे आमदार पळवत आहेत. काँग्रेसने नेहमीच देशाला चांगले नेते दिले. विरोधात असताना रोहन खंवटे तसेच मायकल लोबोंवर विविध आरोप करण्यात आले होते. मात्र, भाजपमध्ये सामील होताच ते शुद्ध झाले का? असा सवालही भिके यांनी यावेळी केला.

Vijay Bhike
Goa Cleanling Campaign: पुढच्या पिढीसाठी जपूया सागर 'संपत्ती'

33 आमदारांनाही भारी पडू: काँग्रेस ही एक चळवळ असून यापुढे लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरू. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल मी अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्टा यांचे आभार मानतो. तसेच आमदार विजय सरदेसाई यांच्यासह काँग्रेसचे आमदार विधानसभेत या 33 आमदारांनाही भारी ठरतील, असा विश्वास भिके यांनी व्यक्त केला.

Vijay Bhike
IIT Goa: आयआयटीला मोठी सुपीक जमीन नकोच!

विजय भिके, कॉंग्रेस नेते-

जेव्हा लहान कंपनी मोठ्या कंपनीत विलीन होते, त्याला विलिनीकरण म्हटले जाते. परंतु, काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. जेव्हा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर मोठे पदाधिकारी दुसऱ्या पक्षात विलीन होतील, त्याला खरे विलिनीकरण म्हणता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com