डीएलएफची गोव्यात 'एन्ट्री'! 50 कोटी किमतीचे सुपर-लक्झरी व्हिला करणार लॉन्च

Goa Tourism: गोव्यात पर्यटनासह अनेक क्षेत्रात गुंतवणुकीस मोठा वाव आहे. राज्यसरकारही विविध क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्याहन देत आहे.
डीएलएफची गोव्यात 'एन्ट्री'! 50 कोटी किमतीचे सुपर-लक्झरी व्हिला करणार लॉन्च
Luxury VillasDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात पर्यटनासह अनेक क्षेत्रात गुंतवणुकीस मोठा वाव आहे. राज्यसरकारही विविध क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्याहन देत आहे. यातच आता, रिअल इस्टेट डेव्हलपर DLF लिमिटेड Q2 FY 2024-25 मध्ये गोव्यात सुमारे 50 कोटी किमतीचे सुपर-लक्झरी व्हिला लॉन्च करणार आहे. DLF ची दिल्ली-NCR बाहेर सुपर-लक्झरी प्रोजेक्ट सुरु करण्याची ही पहिलीच वेळ आहे. Sotheby’s International Realty (ISIR) च्या Luxury Outlook Survey 2024 नुसार, सुमारे 35 टक्के हॉलिडे होम खरेदीदारांनी गोव्याला दुसरे घर म्हणून प्राधान्य दिले, जे देशातील श्रीमंतांमध्ये गोव्याचे आकर्षण दर्शवते.

याव्यतिरिक्त, DLF गोव्यात "बाय इनव्हिटेशन" प्रोजेक्ट अंतर्गत पणजीतील मांडोवी नदीच्या जवळ असलेल्या 38 एकरच्या टेकडीवर 62 सुपर-लक्झरी व्हिला लॉन्च करेल. ऑगस्ट 2024 मध्ये व्हिला प्रोजेक्ट सुरु करण्याची DLF योजना आखत आहे. DLF होम डेव्हलपर्स लिमिटेडचे ​​जॉइंट एमडी आणि चीफ बिझनेस ऑफिसर आकाश ओहरी यांनी सांगितले की, ''येथे टिकट साइज सुमारे 40 कोटी ते 50 कोटी रुपये असेल. या प्रोजेक्टसाठी अपेक्षित टॉपलाइन सुमारे 2500 कोटी रुपये आहे.''

रिअल इस्टेट तज्ञांच्या मते, उत्तर गोवा हे गुंतवणुकीसाठी प्रमुख हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. उत्तर गोव्यातील नैसर्गिक वैभवही गुंतवणूकदारांना आकर्षित करते. उत्तर गोवा हे हॉलिडे होम्ससाठी हॉटस्पॉट बनले आहे.

डीएलएफची गोव्यात 'एन्ट्री'! 50 कोटी किमतीचे सुपर-लक्झरी व्हिला करणार लॉन्च
Goa Tourism: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 150 टक्के वाढ; यंदा एक कोटी पर्यटकांची नोंद

उत्तर गोवा – हॉलिडे होम्ससाठी हॉटस्पॉट

रिअल इस्टेट तज्ञांच्या मते, उत्तर गोवा हे गुंतवणुकीसाठी प्रमुख हॉटस्पॉट म्हणून उदयास आले आहे. उत्तर गोव्यातील नैसर्गिक वैभवही गुंतवणूकदारांना आकर्षित करते. उत्तर गोवा हे हॉलिडे होम्ससाठी हॉटस्पॉट बनले आहे.

डीएलएफची गोव्यात 'एन्ट्री'! 50 कोटी किमतीचे सुपर-लक्झरी व्हिला करणार लॉन्च
Goa Tourism: कुशल पर्यटक मार्गदर्शकासाठी योजना राबविणार; पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मार्च तिमाहीत DLF च्या निव्वळ नफ्यात 61.5% वाढ झाली

जानेवारी-मार्च तिमाहीत डीएलएफचा निव्वळ नफा 61.5 टक्क्यांनी वाढून 921 कोटी रुपये झाला. कंपनीने रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीने एका वर्षापूर्वी याच कालावधीत 570 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 या आर्थिक वर्षात DLF चा निव्वळ नफा 2,733 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 33 टक्के अधिक आहे. DLF चा महसूल देखील वार्षिक 47 टक्क्यांनी वाढून जानेवारी-मार्च तिमाहीत रु. 2,135 कोटी झाला आहे, जो Q4FY23 मध्ये रु. 1,456 कोटी होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी डीएलएफचा एकत्रित महसूल 6,958 कोटी रुपये होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com