Quelossim News: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Kelshi Panchayat controversy: वाझ यांनी आज केळशी पंचायतीत पत्रकार परिषद घेऊन आपल्‍यावर झालेल्‍या आरोपांचे खंडन करत खुलासा केला.
Dixon Vaz
Dixon VazDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केळशी येथे येणाऱ्या एका प्रकल्‍पाबद्दल बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांच्‍या विरोधात आरोप करणारा व्‍हिडिओ व्‍हायरल केल्‍यानंतर आज वाझ यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक डोळ्‍यांसमोर ठेवून आमदार व्‍हिएगस बाणावली मतदारसंघात अशी नौटंकी करत आहेत. त्‍यांना व त्‍यांच्‍या समर्थकांना आपण व्‍हिएगसच्‍या विराेधात आगामी निवडणूक लढविणार, असे वाटत असल्‍यामुळे खोटी माहिती पसरवून ते आपले आणि केळशी गावचे नाव बदनाम करताहेत, असा आराेप वाझ यांनी केला.

वाझ यांनी आज केळशी पंचायतीत पत्रकार परिषद घेऊन आपल्‍यावर झालेल्‍या आरोपांचे खंडन करत खुलासा केला. वाझ म्‍हणाले, ज्‍या प्रकल्‍पाला आमदारांनी विरोध केला आहे, तो प्रत्‍यक्षात प्रकल्‍प नसून तो प्रस्‍ताव प्‍लॉट विभागणी करण्‍यासाठी पंचायतीकडे मागितलेला ‘ना हरकत दाखला’ आहे.

हा अर्ज करणाऱ्यांकडे सर्वप्रकारचे परवाने आहेत. ही जागा उपसरपंच रिंकू लोबो यांच्‍या प्रभागात येते. यासंबंधी तीन बैठका घेतल्‍यानंतर स्‍वत: उपसरपंच लाेबो यांनी या कामासाठी मान्‍यता दिल्‍यानंतर जागेच्‍या विकसकाला पंचायतीने तात्‍पुरती एनओसी दिली आहे.

Dixon Vaz
Quelossim: राज्यात अपघातांचे सत्र संपेना; दुचाकी - बस अपघातात फोंड्याचा युवक ठार

असे असतानाही उपसरपंचांचे यजमान पॉल लोबो हे आपल्‍या विरोधात आरोप करत आहेत. लोबाे हे व्‍हिएगस यांचे समर्थक असल्‍याने व्‍हिएगसही नको ते आरोप करू लागले आहेत, असा दावा वाझ यांनी केला.

केळशी पंचायतीत आपण सरपंच असताना जी कामे झाली आहेत. ती केळशीच्‍या लोकांना माहीत आहेत. आपण सरपंच असताना एकाही व्‍यावसायिक बांधकामाला परवानगी दिलेली नाही. असे असतानाही आमदार व्‍हिएगस आपल्‍यावर आरोप करतात, ही दु:खाची गोष्‍ट आहे. यामागे फक्‍त पुढच्‍या निवडणुकीचे राजकारण लपले आहे, असा आराेप त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com