Diwali Shopping : ‘हस्तकला’त कुणबी शैलीचे आकाशकंदील

वाढती मागणी ः प्रायोगिक तत्त्वावर फक्त २५ नग विक्रीस उपलब्ध
Diwali Shopping kunbi style skylatern
Diwali Shopping kunbi style skylatern Dainik Gomantak
Published on
Updated on

Diwali Shopping : पणजी, यंदा पहिल्यांदाच कुणबी वस्त्रांमध्ये वापरण्यात येणाऱ्या कपड्याचा वापर करून बनवलेले आकाशकंदील, हस्तकला महामंडळाच्या शो-रूम (एम्पोरियम) मध्ये विक्रीला उपलब्ध आहेत.

महामंडळाच्या पुढाकाराने या आकाशकंदिलांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर यंदा फक्त २५ आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध असतील. या खात्याचे व्यवस्थापकीय अधिकारी मेल्विन वाझ यांनी या आकाशकंदिलाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले.

पुढच्या वर्षी अधिक संख्येने या आकाशकंदिलांची रचना करण्यात येईल, असे हस्तकला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Diwali Shopping kunbi style skylatern
Diwali Exhibition - तरंगतर्फे चार दिवसीय दिवाळी प्रदर्शनाचे आयोजन | Gomantak TV

फर्झाना सय्यद या हस्त कारागीर आहेत. ड्राय फ्लॉवर, कुणबी फ्लॉवर पॉट, लॅम्प इत्यादी हस्तकलाकृती त्या बनवतात. त्यांनी यावर्षी प्रथमच आकाशकंदील बनवले आहेत. जेव्हा त्यांचे हे आकाशकंदील तयार झाले, तेव्हा त्यांचे आकर्षक स्वरूप पाहून त्यांना लगेच मागणी आली.

फर्झाना यांनी या कुणबी शैलीचे एकूण ५० आकाशकंदील बनवले आहेत. त्यापैकी २५ आकाशकंदिलांसाठी आगावू नोंदणी झाली आहे. हस्तकला महामंडळाची २५ नगांची ऑर्डर होती.

आकाशकंदिलांना खूप मागणी असूनही अधिक संख्येने त्याची निर्मिती करणे आपल्याला कामांच्या व्यापामुळे शक्य होणार नाही. यंदा ५० घरांमध्ये आपल्याला कुणबी रचनेचे आकाशकंदील झगमगताना दिसतील. पुढच्या वर्षी कदाचित त्यांच्या संख्येत वाढ झालेली असेल. - फर्झाना सय्यद, हस्त कारागीर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com