Diwali 2022: लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

दिवाळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी
Diwali festival
Diwali festivalDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण म्हणजे दिवाळी. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात झाली असून काल नरक चतुर्थीच्या दिवशी नरकासूराच्या भव्य प्रतिमा तयार करून त्यांचे आज पहाटे दहन करण्यात आल्यानंतर आज दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला.

(Diwali festival is celebrated with great enthusiasm in Goa)

Diwali festival
'Beer' किंमतीचा सरकारने पुनर्विचार करावा; विक्रेत्यांनी केली विनंती

अधर्मावर धर्माच्या विजयाच्या आनंदात दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कार्तिक अमावस्या तिथीला लोक घरोघरी देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि दिवा लावतात. लहान दिवे लावून प्रकाश आणण्याचा हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

हिंदू, जैन, शीख यासह इतर अनेक समुदाय दिवाळी हा सण साजरा करतात. दिवाळी हा व्यवसाय आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सण आहे. गोव्यातही हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.

Diwali festival
Goa News: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडविणार- अँथनी वाझ

सुवासिक तेल आणि सुंगधी उटणे लावून नरक चतुर्दशीनिमित्त सोमवारी पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर दुपारनंतर लक्ष्मीपूजन करण्याचे मुहूर्त होते. त्यानुसार लक्ष्मीपूजन करण्यात आले. दिवाळीचा सण आजपासून सुरू झाला आहे. यानिमित्त गोव्याच्या बाजारात ठिकठिकाणी ग्राहकांची विविध वस्तूंसाठी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. घराला तोरण, आकाशकंदील, रांगोळी अशा विविध प्रकारची खरेदी बाजारात करण्यात आली आहे.

दरम्यान वर्ष पद्धतीप्रमाणे श्री महालक्ष्मी पूजन उत्सव समितीतर्फे शहरातून श्री लक्ष्मीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नंतर रात्री मेहता हॉल येथे विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर श्रींची स्थापना करण्यात आली. उद्यापासून पाच दिवस श्री महालक्ष्मी पूजन उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन खारीवाडा येथे करण्यात आले आहे. श्रींची मिरवणूक मेहता हाॅल खारीवाडा येथून सुरुवात झाल्यानंतर एफ एल गोम्स रोड, स्वतंत्र पथ मार्गे वास्को शहरातून नंतर मेहता हॉलमध्ये आगमन झाल्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com