First Crash Fire Driver: विमानात बिघाड झाला की ते तातडीने विमानतळावर उतरविले जाते. अशा वेळी आग लागू नये वा अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथे अजस्त्र धूड वाटणारे एक वाहन विमानाच्या दिशेने वेगाने जात असते. अशा या वाहनाचे सारथ्य आता गोमंतकीय कन्येच्या हाती आले आहे.
कासारवर्णे येथील दिशा नाईक ही तरुणी क्रॅश फायर टेंडर चालविणारी देशातील पहिली प्रमाणित महिला चालक ठरली आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ती तैनात असेल.
विमानतळ प्रकल्पाचे कंत्राट घेतलेल्या ‘जीएमआर’ कंपनीने या पदासाठी अर्ज मागवले होते. त्याला दिशा हिने प्रतिसाद दिला. तिच्या म्हणण्यानुसार वेगळे काही करण्याची संधी यानिमित्ताने तिला चालून आली होती. ती संधी तिने साधली.
खडतर प्रशिक्षण उत्तरप्रदेशातील बरेली आणि तामिळनाडूतील नमक्कल येथे घेतले आणि अखेर सेवेत रुजू होण्याचा क्षण आला आहे. तिचा हा प्रवास ती जेवढ्या हसतपणे सांगते तेवढा सोपा निश्चितच नव्हता.
जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने दिलेल्या जाहिरातीला अनुसरून दिशाने नोव्हेंबर 2021 मध्ये अर्ज केला. 1 जुलै 2022 रोजी ती महिला अग्निशामक दलात रुजू झाली.
पण त्यावर ती समाधानी नव्हती. तिला ते अजस्त्र धूड चालवायचे होते. तिने तशी इच्छा व्यक्त केली. तिला संधी देण्याचे ठरवण्यात आले आणि तामिळनाडूतील खडतर प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. ते प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडल्यानंतर ती देशातील पहिली प्रमाणित क्रॅश फायर टेंडर चालक ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.