गुळेली ग्रामसभेत नवीन बांधकामाच्या विषयावरून गदारोळ; गावडेंनी कारभार हाताळला

सर्वप्रथम गुळेली ग्रामपंचायतीचे नवीन बांधकाम विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.
Gram sabha
Gram sabha Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना (Coronavirus) काळानंतर आणि आयआयटी विषयानंतर आज प्रथमच गुळेली ग्रामपंचायतीची ग्रामसभा (Gram sabha) संपन्न झाली. सरपंच अपूर्वा यांच्या अनुपस्थित उपसरपंच नितेश गावडे यांनी कारभार हाताळला. त्यावेळी पंच अनिल गावडे तथा माजी सरपंच अस्मिता मेळेकर, पंच अर्जून मेळेकर ,पंच विठ्ठल कासकर, पंच विनोद गावकर पंचायत सचिव विनायक गावकर, निरीक्षक लक्ष्मण नाईक आदि उपस्थित होते.

Gram sabha
GPSC: 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाउनलोड

सर्वप्रथम गुळेली ग्रामपंचायतीचे (Grampanchayat) नवीन बांधकाम विषयावरून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले. पंचायत इमारत सुस्थितीत असताना ती मोडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या कामाता कुणाचे हित लपले असा प्रश्न उपस्थित करताच पंचायत मंडळ समर्पक उत्तर देऊ शकले नाही.

गळती लागल्यामुळे नवीन इमारतीचा प्रस्ताव मांडून नवीन इमारतीचे बांधकाम (Construction) हाती घेतल्याचे पंचायत मंडळाकडून सांगण्यात आल्याने गळतीवर उपाय का काढला नाही असा प्रश्न उपस्थित केला. दोन कोटींची इमारत कधी पूर्ण होणार असा सवालही यावेळी उपस्थित केला.

सचिव विनायक गावकर यांनी चांगल्या कामांना सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन केले. नवीन इमारत बांधकामामुळे ग्रामसभा एका छोट्या खोलीत घेण्यात आल्याने ग्रामस्थांच्या रोषाला पंचायत मंडळाला सामोरे जावे लागले.

आयआयटी विषय बराच गाजला

आयआयटी (IIT) वरुन ग्रामस्थांनी पूर्णपणे पंचायत मंडळाला कारणीभूत धरले .पंचायत मंडळापैकी अर्जुन मेळेकर हे एकमेव पंचसदस्य जे आयआयटी विरोधी लोकांसोबत होते. बाकी सर्व पंच हे आयआयटी समर्थनात असल्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचा जाहिर निषेध केला. पंचायत मंडळामुळेच हा प्रकल्प मेळावळी भागात पोचला .काणकोण, सांगे येथे ग्रामसभेतून हा प्रकल्प रद्द केला होता, पण गुळेली पंचायतीने यांविषयावर ग्रामसभाच घेतली नाही यावरुन वातावरण तापले. तत्कालीन सरपंच अस्मिता मेळेकर व तत्कालीन ग्रामपंचायत सचिव यांनी लोकांपासून हा विषय लपविल्याचा आरोप शुभम शिवोलकर व इतर ग्रामस्थांनी यावेळी केला. यासाठी सरपंच व सचिव यांची चौकशी व्हावी असा ठराव यावेळी मांडला

सरकारी दस्तऐवज ग्रामसभेत वाचून दाखवायचा असतो मग आयआयटी संदर्भात आलेले दस्ताऐवज ग्रामसभेत का मांडले नाही याचे उत्तर पंचायत मंडळाने दयावे असे यावेळी ग्रामस्थांनी मांडले. लिखित ठराव असल्याने सचिव विनायक गावकर यांनी सांगितले की यापूर्वी झालेल्या एकाही ग्रामसभेत असा काही ठराव ; दस्तऐवजाचे वाचन झाले नसल्याचे इतिवृत्तावरून कळते असे सांगताच माजी सरपंच अस्मिता मेळेकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दयावे असा आग्रह ग्रामस्थांनी घरताच माजी सरपंच अस्मिता मेळेकर यांनी या विषयी विशेष ग्रामसभा घेण्याचे ठरविण्यात आले होते परंतु ती ग्रामसभा नंतर झालीच नसल्याचे यावेळी मेळेकर यांनी सांगितले.

Gram sabha
GCZMA: 25 जानेवारीपर्यंत 'पर्यावरणीय' नुकसान भरपाईची वसूली करा..!

स्थानिक ग्रामस्थ महेश मेळेकर यांनी आयआयटी वेळी आंदोलकांवर डांबण्यात आलेले खटले मागे घेण्याचा ठराव मांडला याला उत्तर देताना उपसरपंच नितेश गावडे यांनी आपण तसा ठराव सर्व संबंधीतांना पाठवणार असल्याचे मान्य केले. मेळेकर यांनी यावेळी ग्रामस्थावर डांबण्यात आलेल्या खटल्यामुळे नाहक खर्च होतो तो खर्च पंचायतीने उचलावा कशी

मागणी केली यावेळी वातावरण तंग झाले. त्याचबरोबर आयआयटी प्रकारामुळे मेळावली भागातील खूप अशा युवकांच्या बदल्या अन्य ठिकाणी करण्यात आल्या आहे त्या तात्काळ रद्दबाबत करुन पूर्वीच्या जागी आणावे असा ठराव मांडला. ज्यांच्या बदल्या केल्या गेल्या त्याची नावे व ते काम करत असलेली सरकारी खाती याची माहिती पंचायतीमध्ये सादर करावी‌ पंचायतीतर्फे विनवणी करणारे एक पत्र संबंधीतांना पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आयआयटी ठिकाणी असलेल्या जमिनी संबंधितांना नावे कराव्यात. त्याच बरोबर गेली पन्नास साठ वर्षे जे ग्रामस्थ मेळावली भागातील जमिन कसतात त्यांना त्या त्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यास पंचायतीने पुढाकार घ्यावा असा ठराव दिलीप गावकर यांची मांडला. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले.तसेच ज्या सतरा जणांच्या फाईल्स सरपंच अपूर्वा च्यारी यांनी मागविल्या होत्या त्याचे पुढे काय झाले याची माहिती पुढिल ग्रामसभेत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

पुढील ग्रामसभा 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणारतर त्याविषयी माहिती पूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात देण्यात यावी अशी मागणी प्रितेश नाईक यांनी केली. पुढीक बैठकित सरपंचाची उपस्थिती आवश्यक आहे असे म्हणणे उपस्थित ग्रामस्थांचे होते. त्याबरोबर सध्या ठिकाणी असलेल्या ठिकाणी ग्रामसभा घेण्यास जागा अपुरी पडते त्यामुळी पुढील ग्रामसभा एकतर मंडप टाकून घ्यावी किंवा मेळावली भागात असलेल्या पंचायतीच्या अंतर्गत असलेल्या देवस्थानच्या सभागृहात घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सर्वप्रथम उपसरपंच नितेश गावडे यांनी स्वागत केले सचिव गावकर यांनी मागील इतिवृत्त वाचून कायम केले. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मोठ्याप्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com