वास्को येथे तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी भारत सरकार सक्रीय
Disaster Management Training
Disaster Management Training Dainik Gomantak

एम.ई.एस कला व वाणिज्य महाविद्यालय येथे तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अनेक राष्ट्रीय आपत्तीबाबतची माहिती देण्यात आली.यामूळे भारत सरकार तसेच राज्य सरकार राबवत असलेले प्रकल्प यांची ही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली.

(Disaster Management Training Workshop at Vasco)

Disaster Management Training
येत्या तीन दिवसात राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता - IMD

या कार्यशाळेत आर्लेट मास्कारेन्हास यांनी गोवा राज्य आपत्ती रुपरेखासंबंधी माहिती दिली. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय चे उपसंचालक सपना बांदोडकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, धोरण, आराखडा, संस्थात्मक यंत्रणा, पंतप्रधानांचे दहा सूत्री कार्यक्रम, राज्येचे प्लँनिंग मॉडेल- दिशा यासंबंधी माहिती दिली.नर्सिग इन्स्टिटूटच्या माजी फॅकल्टी रेमी लॅसेंडा यांनी सीएसएमएमसी सदस्यांची भूमिका आणि जबाबदारी या विषयावर माहिती दिली.

Disaster Management Training
Bicholim परिसरात कचऱ्याच्‍या राशी!

सी स्कॅन अकादमीचे डॉ. जोस नोरोन्हा यांनी कोरोनाचा धोका व खबरदारी तर आयपीएचबी बांबोळीचे विठोबा म्हाळकर यांनी महिला व मुलांवर आपत्तीचे परिणाम व प्रतिबंध यांनी माहिती दिली. सीआरझेड गोवाचे पर्यावरण शास्त्रज्ञ वैज्ञानिक सल्लागार डॉ. प्रणॉय बैद्य यांनी धोका,जोखीम असुरक्षितता क्षमता यांसंबंधी विश्लेषण केले.

प्रथमोपचार व बँडिंग या विषयावर नर्सिंग इन्स्टिट्यूट बांबोळीच्या माजी फॅकल्टी रेमी लॅसेंडा यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. मनस्वी कामत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रशिक्षणार्थिंनी या कार्यशाळेबद्दल व त्याचा कसा फायदा झाला यासंबंधी विचार मांडले.

ही कार्यशाळा गोवा लोकप्रशासन व ग्रामीण विकास संस्था, महसूल विभाग, जलसंपदा विभाग तसेच झुआरीनगरच्या एम.ई.एस कला व वाणिज्य महाविद्याल यांच्या सहकार्याने आयोजित केली गेली होती. या तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेत महाविद्यालायच्या एनसीसी कॅडेट व एनएसएस स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे समन्वयक आर्लेट मस्कारेन्हास सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com