Goa Assembly: ‘वेदान्ता’च्या खंदकांवर ‘आपत्ती’ पथकाचे लक्ष; मुख्यमंत्री सावंत

Vedanta Mine Issue: खंदकांमध्ये सुरू असलेल्या कामांची दखल घेण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी केली होती
Vedanta Mine Issue: खंदकांमध्ये सुरू असलेल्या कामांची दखल घेण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी केली होती
VedantaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, ता. २ (प्रतिनिधी) : ‘वेदान्ता’ खाणपट्ट्यातील खंदकांमध्ये पाणी भरून वाहत असले तरी तेथे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक डिचोली व साखळी येथील सर्व खंदकांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे लोकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य तासावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी मांडलेल्या समस्यांवेळी दिले.

वेदान्ता’ मायनिंगमधील खाणीतील खंदक भरलेले दिसत असल्याने, भरतीची वेळ आणि धरणाचे गेट सोडण्यात कोणताही ताळमेळ न ठेवता पाणी सोडले जात असल्याने डिचोलीच्या जनतेच्या मनात भीती आहे. तत्काळ खाण खंदकांची तपासणी करा आणि कंपनीला पूर, भूस्खलन आणि आपत्ती होणार नाही, यासाठी आवश्‍यक काळजी घेण्याचे निर्देश द्यावेत.

लामगाव आणि मुळगावच्या लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पंपिंग, पंपिंगचे प्रमाण यासह खंदकांमध्ये सुरू असलेल्या कामांची दखल घेण्यासाठी सर्व सरकारी अधिकाऱ्यांकडून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com