दिग्दर्शक राजदीप नाईक यांनी केजरीवालांच्या उपस्थितीत आपमध्ये केला प्रवेश

वाढती बेरोजगारी आणि सध्याची परिस्थीती आणि लोकांच्या उपजीविकेवर महामारीमुळे होणारा परिणाम पाहता फक्त आप हाच पक्ष गोवेकरांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे असे ते म्हणाले.
Chief Minister Arvind Kejriwal & Rajdeep Naik
Chief Minister Arvind Kejriwal & Rajdeep NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अभिनेते आणि दिग्दर्शक राजदीप नाईक (Rajdeep Naik) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. वाढती बेरोजगारी आणि सध्याची परिस्थीती आणि लोकांच्या उपजीविकेवर महामारीमुळे होणारा परिणाम पाहता फक्त आप हाच पक्ष गोवेकरांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे असे ते म्हणाले.

नाईक हे गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकलाकार आहेत.नाईक मूळचे सावईवेरे- फोंड्याचे रहिवासी आहेत, त्यांनी अगदी लहान वयातच कोंकणी चित्रपटात काम आणि नंतर तियात्र शोची निर्मिती केली. त्याच्या अनेक नाटकांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी कला आणि संस्कृती विभागतर्फे ‘नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यासाठी सहकार्य केले आहे. २०१२ मध्ये त्यांना गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाने युवा सृजन पुरस्कार प्रदान केला. नाईक जुलै महिन्यात सरकारवर टीका केल्याने चर्चेत होते, महामारीमुळे राज्य सरकारने त्यांनी राज्यातील कलाकारांना आर्थिक मदत म्हणून एक वेळ दहा हजारांची मदत घोषीत केली होती, यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. १० हजाराच्या एक रकमेने कलाकार त्यांचे कुटुंब टिकवू शकेल का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता. त्याच्या या प्रश्नांनंतर राजदीपच्या कारची तोडफोड करण्यात आली होती.

Chief Minister Arvind Kejriwal & Rajdeep Naik
Goa: पर्येतील पारंपरिक दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्याने महामारी आणि संबंधित आर्थिक संकटामुळे खूप त्रास सहन केला आहे. आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने साथीच्या काळात गोवेकरांना मदत करण्याचे काम केले आहे, असे राजदीप नाईक म्हणाले. मी राजदीप याचे गोव्याच्या आप टीममध्ये स्वागत करतो. त्यांच्यात गोव्यातील युवकांसाठी काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा आहे. मी त्यांच्यासोबत गोव्यातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com