Flights To Goa: एका शहरातून बंद तर दुसऱ्या शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरु होणार, वाचा सविस्तर

Flights To Goa: दोन्ही शहर उत्तर भारतातील असून, एकीकडे नाराजी तर दुसरीकडे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
Flights To Goa
Flights To GoaDainik Gomantak

Flights To Goa

गोव्यासाठी एका शहरातून थेट विमानसेवा बंद होणार असून, दुसऱ्या एका शहरातून थेट विमानसेवा सुरु होणार आहे. दोन्ही शहर उत्तर भारतातील असून, एकीकडे नाराजी तर दुसरीकडे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

गौतम बुद्ध नगरमधील निर्माणाधीन नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याला थेट विमानसेवाही सुरू होणार आहे. यासाठी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दोन विमान कंपन्यांशी चर्चा केली आहे. दिल्ली एनसीआरमधील अनेक पर्यटक गोव्याला येत असतात, असे खंवटे म्हणाले.

तर, दुसरीकडे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ ते आग्रा आणि गोव्याला जाणारी उड्डाणे येत्या काही दिवसांत बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या इंडिगोचे आग्रा-भोपाळ ७२ आसनी विमाने सुरु असून, या हवाई मार्गावरील 27 मार्चला शेवटचे उड्डाण असेल असे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर 28 मार्चपासून कोणतेही ऑनलाइन फ्लाइट शो होत नाहीयेत किंवा आगाऊ बुकिंग स्वीकारले जात नाहीये.

Flights To Goa
Goa-Lakshadweep flight: गोव्यातील Fly91 चे गोवा ते लक्षद्वीप पहिले उड्डाण, दोन शहरांसाठी थेट विमानसेवा लवकरच

आग्रासाठी पुरेशा प्रमाणात प्रवासी नाहीत. त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, गोव्याला जाणारे देखील पुरेसे प्रवासी नाहीत, त्यामुळे विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गोवा पर्यटन विभाग राज्यात रिजनरेटीव्ह पर्यटनाचे नवे मॉडेल सुरू करत आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील पर्यटकांना थेट गोव्याशी जोडण्यासाठी हवाई सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com