Flights To Goa: धोनीच्या रांचीतून गोव्यासाठी थेट विमानसेवा पण विमानभाडे गगनला भिडले

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यासाठी तिकीटाचे दर 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
Flights To Goa
Flights To GoaDainik Gomantak

Flights To Goa: झारखंडची राजधानी आणि एम.एस धोनीच्या रांची येथून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी रांची ते गोवा थेट विमानसेवा जाहीर करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव ती सुरू होऊ शकली नाही. डिसेंबरमध्ये विमानसेवेची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून ही विमानसेवा सुरू करण्यात आली असून, अॅडव्हान्स बुकिंगही सुरु करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यापासून रांची येथून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे. लोक यासाठी बुकिंगही करत आहेत. मात्र, लोकांना गोव्याला जाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत, असे एका टूर अँड ट्रॅव्हल ऑपरेटरने हिंदी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

तिकिटाची किंमत 15,000 पर्यंत

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यासाठी तिकीटाचे दर 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर सामान्य दिवशी ही किंमत 6,000 ते 7,000 रुपयेच असते, परंतु नवीन वर्ष स्वागतच्या पार्श्वभूमीवर विमानभाडे दरही गगनाला भिडले आहेत. गोव्याला जाण्यासाठी ट्रेन असली तरी ती आठवड्यातून एकदाच धावते.

रांची मार्गे वास्को द गामा धावणाऱ्या ट्रेनची प्रतीक्षा यादी 90 टक्केच्या वर जात आहे.

केवळ गोवाच नाही तर नवीन वर्षात लोक कोलकाता, मुंबई आणि दिल्लीलाही जात आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोलकाता जाण्यासाठी भाडे 8000 रुपये आहे. मुंबईत भाडे 15 हजारांपर्यंत, बेंगळुरूमध्ये 11 हजारांपर्यंत आणि दिल्लीत 7000 पर्यंत पोहोचले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com