Keri - Sattari : दीपेश गावस वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

कुटुंबीयांसोबत आंघोळ करताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती
Deepesh Gavas
Deepesh Gavas Dainik Gomantak
Published on
Updated on

केरी सत्तरी येथील घोटेली नं. 1 येथील पोलिस चौकीच्या मागील कळस कोण या नदीत काल रविवार, दुपारी एक नंतर 16 वर्षीय विद्यार्थी दीपेश नामदेव गावस ( गावस वाडा) केरी-सत्तरी याचा बुडून मृत्यू झाला होता. त्यावर आज दुपारी केरी येथे अंतसंस्कार करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार मयत दीपेश गावसचे कुटुंब आंघोळीसाठी कळस कोण या नदी पात्रात आले होते. यावेळी दीपेश आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी ग्रामस्थांनी दीपेशला पाण्यातून बाहेर काढले असता त्याचा मृत्यू झाला होता.

Deepesh Gavas
Car Burned in Caranzalem: करंझाळेत कारने अचानक घेतला पेट, सुदैवाने टळली जीवीतहानी...

यावेळी १०८ रुग्ण वाहिका बोलविण्यात आली होती. त्याचबरोबर वाळपई पोलिस व वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ते पोहचण्याआधीच ग्रामस्थांनी त्याला नदी किनारी काढून साखळी इस्पितळात नेले होते.

मात्र, तेथे डाॅक्टरांना त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला होता. आज सोमवारी त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येंने ग्रामस्थ, नातेवाईकांची उपस्थिती होती.

दीपेश हा शांत स्वभावाचा मुलगा म्हणून परिचित होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याच्या दुर्दैवी निधनाने मित्रांना अश्रू अनावर झाले होते.

Deepesh Gavas
Karnataka Election 2023: का दिली कर्नाटक मतदानाला सुट्टी? गोवा सरकारने कायदा सांगत दिले स्पष्टीकरण

कळस कोण येथे अनेकांचा बळी

घोटेली नं. १ येथील वाहणारी कळस नदी ही मुख्य नदी असून वाळवंटी चोर्ला घाटातून वाहते. त्यात दीपेशचा दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांना जुन्या घटनेची आठवण झाली. सदर परिसर हा अत्यंत धोकादायक असून आजपर्यंत अनेकांचा तिथे बुडून मृत्यू ओढवला आहे. सदर, नदी पात्र हे खोलवर असून गोल भोवरा तयार होत आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही.

‘वाळवंटी’ वर आंघोळीसाठी गर्दी

या दिवसात पर्यटकांची वाळवंटी नदीवर मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे याचा त्रास स्थानिकांना होत आहे. मौज मजेसाठी लोक येतात व सर्वत्र दारुच्या बाटल्या, कचरा नदी पात्रात टाकत आहे. त्यामुळे स्थानिकांत संताप आहे. यावेळी अशा गोंधळी पर्यटकांना बंदी घालणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com