Valpoi News : दीपाजींचे गोवा मुक्तीत महत्त्वाचे योगदान! मुख्यमंत्री सावंत

Valpoi News : नाणूस किल्ल्याच्या सौंदर्यीकरणाची पायाभरणी
Valpoi
Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : वाळपई , देशात १८५७ याआधी खरी क्रांती १८५२ साली सत्तरी तालुक्यातून क्रांतीवीर दीपाजी राणेंनी पोर्तुगीजांविरोधात केली होती. म्हणूनच गोव्याचा इतिहास हा फारच जुना आहे.

खऱ्या क्रांतीची लढाई सत्तरी तालुक्यातूनच प्रथम देशात झाली होती. सत्तरीचे बंड दीपाजींनी केले व दादा राणेंनी पुढे तो वारसा चालविला होता,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

नाणूस सत्तरी येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे बांधण्यात येत असलेल्या क्रांतीवीर दीपाजी राणेंच्या किल्याच्या सौंदर्यीकरण कामाच्या पायाभरणी सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

क्रांतिकारकांच्या पवित्र भूमीला मानवंदना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व क्रांतीवीर दीपाजी राणे, दादा राणे यांचे फार योगदान लाभलेले आहे.

Valpoi
Goa Traffic Issue: पणजीकरांच्या मागची वाहतूक कोंडी काही सुटेना; weekend ला मिरामार रोडवर तब्बल दीड तास वाहतूक ठप्प

अशा क्रांतीवीरांमुळेच गोव्यातील धर्म परिवर्तन हे रोखले गेले होते. क्रांतीवीर दीपाजींचे गोवा मुक्ती लढ्यात फार मोठे योगदान लाभले आहे

पर्येच्या आमदार दिव्या राणे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक ॲड. शिवाजी देसाई, भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, वाळपई नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, दीपाजी राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, विविध खात्याचे सरकारी अधिकारी, नगरसेवक, विविध पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य आदींची उपस्थिती होती.

शिवाजी देसाईंनी प्रास्ताविक केले. डॉ. सावंत यांनी प्रथम दीपाजी राणे किल्ल्याला मानवंदना दिली.

बलिदानाची आठवण

दिव्या राणे म्हणाल्या संघर्ष, बलिदानाची आठवण सदैव राहिली पाहिजे.

क्रांतीवीर दादा राणे व क्रांतीवीर दीपाजी राणेंच्या घरांना वारसा स्थळ म्हणून मान मिळाल्याचा आनंद आहे. या महान योद्ध्यांचे स्मरण कायम स्वरुपी राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com