Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak

Goa Panchayat: शिवोलीत दिलायलांचे वर्चस्व कायम

शिवोली पंचक्रोशीतील सहाही पंचायतींवर विद्यमान आमदार दिलायला लोबो यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले.
Published on

शिवोली: शिवोली पंचक्रोशीतील सहाही पंचायतींवर विद्यमान आमदार दिलायला लोबो यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. मार्ना-शिवोली पंचायतीच्या एकूण नऊ प्रभागांपैकी सहा प्रभागांत दिलायला लोबो पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत.

(Dilaila Lobo, the incumbent MLA, proved to be dominant in all the six panchayats in Siolim)

Delilah Lobo
Goa Panchayat: तिसवाडी तालुक्यात प्रस्थापितांना धक्के

आसगाव-बादे, हणजूण-कायसूव, ओशेल, सडये तसेच वेर्ला-काणकातही दिलायलांचे समर्थन मिळालेले बहुतेक पंचसदस्य निवडून आले आहेत. शिवोलीतून प्रथमच पंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ‘आरजी’च्या उद्देश पांगम यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवत माजी पंच सदस्य तसेच काही काळासाठी सरपंच पदावर राहिलेल्या फेर्मिना फर्नांडिस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. शिवोलीत पंचवीस वर्षे राज्य केलेले माजी सरपंच सिल्वेस्टर फर्नांडिस यांचा यंदा पराभव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com