Digital Arrest ची घातली भीती, 1.42 कोटी लुबाडले! आसामच्या संशयितांना अटक; 358 सीमकार्ड, 5 मोबाईल जप्त

Digital Arrest Bicholim: डिचोली येथील एका महिलेने याप्रकरणी तक्रार केली होती. संशयितांनी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क साधून आपण सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे सांगितले.
Digital Arrest
Digital ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे भासवून डिचोली येथील महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून तब्बल १ कोटी ४२ लाख ४ हजार ८६८ रुपये लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे विभाग पोलिसांनी नगाव (आसाम) येथून संशयित अशादुल इस्लाम (वय २४ वर्षे) आणि यास्मिना अहमद (वय ३२ वर्षे) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सीमकार्ड आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत.

डिचोली येथील एका महिलेने याप्रकरणी तक्रार केली होती. संशयितांनी व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क साधून आपण सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचे सांगितले. काही आरोप असल्याचे सांगून त्यांनी या महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची भीती घातली.

त्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांना १ कोटी ४२ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने त्वरित सायबर पोलिसांत धाव घेतली.

संशयितांकडून आसाम पोलिसांनी ३५८ सीमकार्ड, ५ मोबाईल फोन, वाय-फाय राउटर आणि लॅपटॉप जप्त केला होता. या गुन्ह्यातही तेच मोबाईल वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित एकाच ‘आयएमईआय’ क्रमांकाच्या उपकरणावर अनेक सीमकार्ड वापरून देशभरात फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

Digital Arrest
Goa Fraud: 'मी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बोलतोय'! तोतया ऑफिसरने साधला डाव; कॅफेमालकाला घातला 9 लाखांचा गंडा

आणखी एक प्रकरण उघडकीस

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल आरिफ आगा, रूपेश गायकवाड आणि प्रकाश यांच्या विशेष पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आसाममधील नगाव गाठून संशयितांना अटक केली. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. याच संशयितांनी गोव्यातील अन्य एका प्रकरणात ६३.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Digital Arrest
Goa Job Fraud: 24 लाख घेतले आणि फसवले! चिखलीतील पतीपत्नीवर गुन्हा दाखल; जहाजावर नोकरी देण्याचे दिले होते आमिष

सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नवीन नाईक आणि कॉन्स्टेबल संयोग शेट्ये यांनी तांत्रिक विश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले. या कारवाईमुळे देशभरातील ‘डिजिटल अरेस्ट’चे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com