Lok Sabha Election: लोकसभा उमेदवारीवर दिगंबर कामत यांचे मौन

Lok Sabha Election: 30 लाख खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ
Lok Sabha Election|Digambar Kamat
Lok Sabha Election|Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election:

दक्षिण गोवा लोकसभा उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल सर्व काही सांगितले असून त्यावर आपल्याला आणखी टिप्पणी करायची नाही. स्वत:च्या उमेदवारीबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्र्नाला उत्तर देण्याचे टाळले व मौन राखणेच पसंत केले.

फातोर्डा येथील प्रभाग 5 व प्रभाग 7 मधील विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर कामत पत्रकारांशी बोलत होते.

याप्रसंगी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक कामिल बार्रेटो, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर व नगरपालिकेचे अभियंते, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रभाग 5 हा नगरसेविका स्वेता लोटलीकर यांचा तर प्रभाग 7 हा मिलाग्रीन गोम्स यांचा आहे.

Lok Sabha Election|Digambar Kamat
Comunidade: थिवी कोमुनिदादच्या माजी ॲटर्नीवर गुन्हा

सौंदर्यीकरण करणार

प्रभाग ७ मध्ये आगाळी येथील हॉली क्रॉसजवळ सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभाग ५ मध्ये गेली तीन वर्षे नाला बांधण्याचे काम प्रलंबित होते. ते आजपासून सुरू करण्यात येत असल्याचे तसेच पहिल्या टप्प्यात जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांचे उद्‌घाटनही करण्यात आल्याचे कामत यांनी सांगितले. दोन्ही प्रभागांतील कामांचा खर्च अंदाजे प्रत्येकी १५-१५ लाख रुपयांचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Digambar Kamat vegetable vendors
Mopa Airport Link Highway Toll
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com