Sonsodo Project In Margao: ...म्हणून दिगंबर कामत यांनी भाजप सरकारला दोषी ठरवले

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर सोनसडो व्यवस्थापनात अडथळे आणल्याबद्दल दोषी ठरवले.
दिगंबर कामत
दिगंबर कामतSandip Desai

मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर सोनसडो व्यवस्थापनात अडथळे आणल्याबद्दल दोषी ठरवले. ते म्हणाले “मी मुख्यमंत्री असताना सोनसडोच्या स्वच्छतेसाठी तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढली होती. प्लांटही उभारला होता पण नंतर माझा कार्यकाळ 2012 मध्ये संपुष्टात आला. माझ्यानंतर आलेल्या सरकारने हा प्रकल्प पाहिजे तसा जोमाने हाती घेतला नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला.

(Digambar Kamat Allegation on BJP Government In goa)

दिगंबर कामत
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पण गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले?

कामत यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार, सवलतधारकांची (प्रकल्पाची) थकबाकी भरण्यात पालिका अयशस्वी ठरल्याने त्यांनी काम सोडले, असे कामत म्हणाले.

मी आमदार आणि मंत्री झाल्यावर त्याची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले, आता मडगाव नगरपालिका पुन्हा त्यांच्याच ताब्यात असल्याने सोनसोडो प्रकल्प पुन्हा रुळावर येईल. असे कामत म्हणाले. "सोनसडोचा इतिहास जाणून न घेता" त्याच्या विरोधकांवर त्यांनी आणि नगरपालिकेवर टीका केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दिगंबर कामत
Goa Environment Care: 'कर्नाटकच्या धरणांमुळे गोव्याच्या पर्यावरणावर होईल परिणाम'; विजय सरदेसाई

"मडगाव नगरपालिका आता माझ्या ताब्यात आहे. मी सोनसडो प्रकरणाकडे वैयक्तिक लक्ष देत आहे," असे कामत म्हणाले. कामत यांच्यासह गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोनसडोला भेट देऊन कामाचा पाक्षिक आढावा घेणार असल्याचे जाहीर केले.

“जोपर्यंत कोणीतरी या समस्येवर लक्ष ठेवत नाही तोपर्यंत त्याचे निराकरण करणे शक्य होणार नाही. घनकचरा व्यवस्थापन महामंडळ ही नोडल एजन्सी असल्याने दर 15 दिवसांनी प्रगतीचे निरीक्षण करेल आणि निर्णयांची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहेल आणि पुढील 15 दिवसांचे नियोजन करेल,” ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com