IFFI 2023: भारतात चित्रपट निर्माते शोधणे कठीण : निर्माता पॅनलिस्ट सदस्यांचे मत

IFFI 2023 Goa: चित्रपटास वित्त पुरवठादार मिळणे आव्हानात्मक
IFFI 2023 Goa
IFFI 2023 Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2023 Goa: भारतात चित्रपट बनविण्यासाठी निर्माते शोधणे सध्या कठीण झाले आहे. नवीन चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट मॉनिटाईझ करण्यासाठी इतर पद्धती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत पॅनेलचे सदस्यांनी व्यक्त केले.

कला अकादमी येथे ५४व्या इफ्फीच्या संवाद सत्रादरम्यान चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या चार पॅनेलिस्टांनी निदर्शनास आणले की आजकाल चित्रपटाचे आर्थिकीकरण आव्हानात्मक बनले आहे.

पॅनेलचे सदस्य प्रितुल कुमार म्हणाले की, वित्तपुरवठ्याचा अधिक विचार करणे आवश्यक आहे. यूट्यूबवर चित्रपट टाकल्यास पैसेही मिळू शकतात. आपल्या चित्रपटांची कमाई करण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतींचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.

फ्रान्स आणि इतर देशांत कोणीही फिल्मचे शाश्वत अधिकार घेत नाहीत. निर्माते-दिग्दर्शकांजवळच शाश्वत हक्क राहिले पाहिजेत. मी नावीन्यपूर्ण कल्पना शोधत असते. महिलांवरील अत्याचार दर्शवणारे चित्रपट मी करत नाही, असे निर्मात्या सुनीता ताती म्हणाल्या.

IFFI 2023 Goa
Rani Mukerji: राणीने आमिरच्या 'लगान'मध्ये 'या' कारणामुळे केले नाही काम;IFFI मध्ये मोठा खुलासा

‘एनएफडीसी’ संस्था चित्रपटाला खूप जास्त निधी देत ​​आहे. चित्रपटांसाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारेही त्यांच्या राज्यात चित्रीकरणासाठी प्रोत्साहन देत आहेत. जर राज्य सरकार त्या राज्यात फिल्म चित्रीकरण करण्यास ३० टक्के सूट देत असेल तर ते एखाद्या नवोदित चित्रपट निर्मात्याला खूपच चांगले आहे.

- प्रितुल कुमार, चित्रपट निर्माता पॅनेलचे सदस्य

पूर्वी चित्रपट उद्योग हा विक्रेत्यांचा बाजार होता; पण आता तो खरेदीदारांचा बाजार झाला आहे. बंगाली ही जगात सहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे; परंतु बंगाली चित्रपटाची मोठी बाजारपेठ नाही. आपण उत्कटतेने चित्रपट बनवतो आणि मग सर्व देवाच्या विश्‍वासावर सोडून देतो.

- फिरदौसल हसन, चित्रपट निर्माता, पश्चिम बंगाल

चित्रपट निर्मिती ही व्यावसायिक कला आहे. यासाठी काही विशिष्ट खर्च असतो. चित्रपट पूर्ण झाल्यावर, चित्रपटासाठी खरेदीदार शोधणे हा महत्त्वाचा भाग असतो. चित्रपट प्रदर्शित होतो आणि निर्मात्यांना नफा मिळतो. मी वर्षाला शंभर स्क्रिप्ट्स वाचतो; पण त्यातून फक्त दोन-तीनच उठावदार असतात.

- शारिग पटेल, चित्रपट निर्माता पॅनेलचे सदस्य

नवीन चित्रपट निर्मात्यासाठी चित्रपटाची कमाई करणे कठीण आहे. परंतु चित्रपट उद्योगाच्या संरचित व्यवस्थेत कमाई करणे सोपे होते. जेव्हा आम्ही प्री-सेल करतो तेव्हा आम्हाला शाश्वत अधिकार देण्यास सांगितले जाते, येथे आम्हाला सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता आहे.

- सुनीता ताती, चित्रपट निर्मात्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com