Madgaon News : सासष्‍टीतील मतांची तफावत इतर ठिकाणी भरून काढणार : फळदेसाई

Madgaon News : गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना फळदेसाई म्‍हणाले की, भाजपच्‍या दक्षिण गोव्‍यातील उमेदवार पल्‍लवी धेंपे या किमान ५० हजार मतांच्‍या आघाडीने जिंकून येतील, कारण मुरगाव तालुक्‍याबरोबर अन्‍य चार तालुक्‍यांतही भाजपला आघाडी मिळेल.
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak

Madgaon News :

मडगाव, सासष्‍टी तालुक्‍यात भाजपची कामगिरी तशी असमाधानकारकच राहिली आहे. परंतु यावेळी आमच्‍याकडे दिगंबर कामत आणि आलेक्‍स सिक्‍वेरा या दोन प्रभावी नेत्‍यांसह एकूण तीन आमदार आहेत.

कुडतरी मतदारसंघात आम्‍हाला चांगला पाठिंबा मिळतोय. त्‍यामुळे यावेळी सासष्‍टीतही चांगली कामगिरी करू आणि या तालुक्‍यात जर काही मतांची तफावत राहिलीच तर ती आम्‍ही अन्‍य मतदारसंघांत मिळणाऱ्या आघाडीने भरुन काढू, असा विश्‍‍वास समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्‍यक्त केला.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना फळदेसाई म्‍हणाले की, भाजपच्‍या दक्षिण गोव्‍यातील उमेदवार पल्‍लवी धेंपे या किमान ५० हजार मतांच्‍या आघाडीने जिंकून येतील, कारण मुरगाव तालुक्‍याबरोबर अन्‍य चार तालुक्‍यांतही भाजपला आघाडी मिळेल.

Minister Subhash Phaldesai
Goa: पाच वर्षात 71 व्यक्ती, 30 प्राण्यांचा मृत्यू; ढवळीकरांनी राजीनामा द्यावा - रमाकांत खलप

सासष्‍टी ही भाजपसाठी ‘दुखरी नस’ असली तरी यावेळी हा तालुकाही आम्‍हाला चांगली मते देईल. दिगंबर कामत यांच्‍या मडगाव मतदारसंघात भाजपला बऱ्यापैकी आघाडी मिळणार हे निश्‍चित आहे.

याशिवाय नावेली आणि फातोर्डा येथेही आम्‍ही चांगली कामगिरी करू. कुडतरी आणि नुवेत आम्‍हाला दोन्‍ही आलेक्‍स खूपच फायद्याचे ठरतील, असेही मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

बेरोजगारीला विरियातोंसारखे एनजीओच कारणीभूत

पल्‍लवी धेंपे यांनी आपल्‍यासमोर लोकांनी बेरोजगारीचा प्रश्‍‍न मांडला असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यामुळे विरोधक गोव्‍यात बेरोजगारी असल्‍याचे भाजप उमेदवारानेच मान्‍य केले असे म्‍हणू लागले आहेत. त्‍यावर फळदेसाई यांना विचारले असता ते म्‍हणाले, बेरोजगारीचा प्रश्‍‍न आहेच. कारण गोव्‍यात खनिज उद्योग बंद आहे.

कुठलाही नवीन उद्योग आल्‍यास कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍यासारखे एनजीओ त्‍यास विरोध करतात. गोव्‍यातील बेरोजगारीला हे एनजीओच जास्‍त कारणीभूत आहेत. त्‍यांच्‍यामुळेच स्‍थिती बिघडते, असा सनसनाटी आरोप फळदेसाई यांनी केला.

पल्‍लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्‍यामुळे भाजप कार्यकर्ते नाऊमेद झाले आहेत या म्‍हणण्‍यात काही तथ्‍य नाही. दक्षिण गोव्‍यातील प्रश्‍नांबद्दल त्‍यांना काहीही माहिती नाही, असा जो विरोधक आरोप करतात, त्‍यातही तथ्‍य नाही.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com