केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. परिणामी लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा किमती वाढू लागल्या आहेत. सध्या कच्चे तेल प्रति बॅरल $120 च्या आसपास पोहोचले आहे. यामुळे इंधनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Petrol-Diesel Rates in Goa)
गोव्यात आज पेट्रोल 97.84 तर डिझेल 90.39 रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
Goa Petrol Price
North Goa ₹ 97.84
Panjim ₹ 97.84
South Goa ₹ 97.75
Goa Diesel Price
North Goa ₹ 90.39
Panjim ₹ 90.39
South Goa ₹ 90.29
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमधून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विशेषत: खासगी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांना तेल मिळत नसल्याच्या बातम्या येता आहेत. आता केंद्र सरकारने (Central Government) याबाबत पाऊल उचलले आहे.
काय आहे सरकारचा निर्णय:
पेट्रोल डिझेल खासगी पंपांची मनमानी रोखण्यासाठी सरकारने युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन (यूएसओ) ची व्याप्ती वाढवली आहे. "सरकारने आता रिमोट रिटेल आउटलेट्स (ROs) सह सर्व पेट्रोल पंपांवर USO ची व्याप्ती वाढवली," असे सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.