Goa: अतिसार नियंत्रण जागृती मोहिमेस सुरुवात

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे 15 जुलै पासून अतिसार नियंत्रण जागृती देशभर राबविण्यात येत आहे.
अतिसार नियंत्रण जागृती कार्यक्रमात बोलताना मान्यवर
अतिसार नियंत्रण जागृती कार्यक्रमात बोलताना मान्यवरDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: केंद्र सरकारच्या (Government) आरोग्य मंत्रालयातर्फे (Health Ministry) 15 जुलै पासून अतिसार नियंत्रण जागृती (Diarrhea control awareness) देशभर राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गोव्यातही (Goa) आरोग्य खात्याच्या राज्य कुटुंब कल्याण ब्युरो तर्फे 27 जुलै ते 31 जुलै असे 15 दिवस ही मोहिम राज्यात राबविण्यात येत आहे. (Diarrhea control awareness campaign launched in Goa)

या मोहिमेची सुरुवात चिखली आरोग्य उपकेंद्रात झाली. त्या निमित्त पाच वर्षांखालील मुलांसाठी ओआरएस व झिंक पॅकेट्स देण्यात आले. शिवाय अतिसार नियंत्रण संबंधी जागृती करण्यासाठी केंद्रात प्रदर्शन, रांगोळी, चित्रकला, भिंतीपत्रक रंगवणे सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या संपुर्ण कार्यक्रमात रुग्णांचे नातेवाईक, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात तज्ञ डॉक्टरांनी पालकांना या आजारबद्दलची तसेच सोपेपणी उपचार कसे करावे याची माहिती दिली. काही पालकांच्या शंकाचे निरसन या तज्ञ डॉक्टरांनी केले.

अतिसार नियंत्रण जागृती कार्यक्रमात बोलताना मान्यवर
Goa Assembly Session: मोले प्रकल्पांवरुन सरकार बॅकफूटवर

जरी ही मोहिम 15 दिवसांसाठी ्असली तरी पावसाळा सुरु झाल्यावर व संपेपर्यंत अतिसार नियंत्रणासाठी सर्व उपाय योजिले जातात अशी माहिती उपकेंद्रपाचे निरिक्षक डॉ. उपेंद्र उंब्रसकर यांनी दिली. 

कन्सलटंट डॉ. रश्मी बोरकर यांनी सांगितले की ही मोहिम संपुर्ण देशांमध्ये राबविली जात असुन पाच वर्षांखालील मुलांची खास काळजी घेण्यासाठीची जागृती या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे. अशा प्रकारची जागृती राज्यातील इतर उपकेंद्रांमध्ये करण्यात येईल असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com