Football Tournament: धेंपो ज्युनियर्सची विजयी सलामी

गोवा पोलिस कप: सेंट अँथनी संघावर डागले पाच गोल
Dhempo Juniors
Dhempo JuniorsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेला सोमवारी दणक्यात सुरवात झाली. धेंपो ज्युनियर्सने विजयी सलामी देताना सेंट अँथनी क्लब-मार्ना संघाचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

(Dhempo Juniors' winning opening in the Goa Police Cup football tournament)

Dhempo Juniors
Ind Vs Zim: दिग्गजांना मागे टाकत शुभमन गिलने बनवला खास 'रेकार्ड'

सामन्याच्या पूर्वार्धात सेंट अँथनी क्लबने चांगली खिंड लढविली, पण नंतर उत्तरार्धात धेंपो ज्युनियर्सने पूर्णतः वर्चस्वासह गोलधडाका राखला. पूर्वार्धातील सहा मिनिटे असताना सेंट अँथनी क्लबचा एक खेळाडू कमी झाला. मार्ना येथील संघाच्या काशिराम पोंबुर्फेकर याला 39 व्या मिनिटास धोकादायक खेळाबद्दल रेफरीने थेट रेड कार्ड दाखविले.

विश्रांतीनंतरच्या तिसऱ्याच मिनिटास श्रेयस नाईक याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर 56 व्या मिनिटास सैरॉन आल्बुकर्क याने शानदार हेडिंगवर संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. लगेच दोन मिनिटानंतर श्रेयशने ताकदवान फटक्यावर आणखी एक गोल केला. त्यामुळे धेंपो ज्युनियर्सची आघाडी 3 -0 अशी मजबूत झाली. शेल्डन फर्नांडिसने 67 व्या, तर जिमी कुलासोने 84 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल करून धेंपो ज्युनियर्सच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेचे उद्‍घाटन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलिस महानिरीक्षक ओमवीरसिंग बिष्णोई, पोलिस अधीक्षक (क्रीडा विभाग) बॉस्को जॉर्ज, पोलिस उपअधीक्षक (क्रीडा विभाग) विल्सन डिसोझा, पोलिस अधीक्षक (गुन्हे) निधिन वाल्सन, पोलिस अधीक्षक (मुख्यालय) शेखर प्रभुदेसाई, गोवा फुटबॉल विकास मंडळाचे (जीएफडीसी) अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांची उपस्थिती होती.

आता सीनियर संघाचे आव्हान

धेंपो ज्युनियर्सने एकतर्फी विजयासह स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर सीनियर संघाचे आव्हान असेल. शुक्रवारी (ता. २७) धेंपो स्पोर्टस क्लबचा मुख्य संघ ज्युनियर संघाविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत खेळेल. मंगळवारी (ता. 23) स्पर्धेत एफसी गोवा आणि शापोरा युवक संघ यांच्यात लढत होईल. धुळेर स्टेडियमवर वेळसाव क्लब आणि यूथ क्लब ऑफ मनोरा यांच्यात सामना खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com