मित्र मित्र गेले पोहायला, पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवले संकट; दूधसागर नदीत बुडालेल्या 15 वर्षीय मुलाचा सापडला मृतदेह

Goa Drowning Death Cases: धारबांदोडा-धडे येथील दूधसागर नदीत बुडालेला देवांशु सीताराम चंदवाडकर (१५) याचा मृतदेह पाण्यात तरंगताना फोंडा अग्निशामक दलाला सापडला.
Goa Drowning Death Cases
DrowningDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: धारबांदोडा-धडे येथील दूधसागर नदीत बुडालेला देवांशु सीताराम चंदवाडकर (१५) याचा मृतदेह पाण्यात तरंगताना फोंडा अग्निशामक दलाला सापडला. फोंडा पोलिसांनी रितसर पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी मडगाव हॉस्पिसिओमध्ये पाठविला आहे. शवचिकित्सा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयाच्या स्वाधीन करणार आहेत, असे फोंडा पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी फोंडा येथील क्रीडा संकुल येथे खेळण्यासाठी जात असल्याचे घरी सांगून निघालेला देवांशु तेथे न जाता आपल्या ४ मित्रांना घेऊन धडे येथील दूधसागर नदीवर गेला होता.

त्यावेळी आंघोळ करताना देवांशु व अन्य एक पाण्यात बुडू लागल्याने अन्य विद्यार्थी मित्रांनी एकाला वाचविले; पण देवांशु हा खोल पाण्यात गेला त्यामुळे त्याला वाचविण्यास त्याच्या मित्रांना यश आले नसल्याने तो बुडाला होता.

Goa Drowning Death Cases
Goa Drowning Death: 'मी खेळायला जातो...' शब्द अखेरचे ठरले! धारबांदोडा येथेे दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश

दरम्यान, देवांशु याचे मूळ घर कुडाळ येथे असून गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंबीय धडे येथे वास्तव्यास होते. वडील उसगाव येथील एका कंपनीत कामाला तर आई घरकाम करते. देवांशुला एक लहान भाऊही आहे. मृतदेह कुटुंबीयाच्या स्वाधीन केल्यानंतर तो मूळ गावी नेण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी फोंडा पोलिसांना दिली.

Goa Drowning Death Cases
Bicholim Car Drowning: रिव्हर्स घेताना गोंधळ झाला, कार गेली थेट नदीत; डिचोली सारमानस धक्क्यावरील थरारक घटना Video

लोकांची मनमानी ठरते कारणीभूत!

माजी सरपंच बालाजी गावस म्हणाले की, गावाबाहेरील लोक या ठिकाणी येतात त्यांना खोल पाण्याचा अंदाज येत नसल्याने ते बुडतात. पंचायतीने या ठिकाणी आंघोळ करू नये, असे फलक लावले होते; पण बाहेरून येणारे लोक ऐकत नाहीत. स्थानिकांनी त्यांना विचारल्यास ते भांडण करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com