Goa Police: ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Goa Police: केंद्रीय राखीव दलातील पोलिस उपनिरीक्षक धनू भोगाटी याच्या सर्व्हीस पिस्तुलातून गोळी सुटल्याने त्याची पत्नी गौरी जखमी झाली.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: केंद्रीय राखीव दलातील पोलिस उपनिरीक्षक धनू भोगाटी याच्या सर्व्हीस पिस्तुलातून गोळी सुटल्याने त्याची पत्नी गौरी जखमी झाली.

याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल पोलिसांनी धनू याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

Goa Police
Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी गौरीने जबानीत म्हटले की, घराची साफसफाई करताना तिने तेथे पिस्तूल पाहिले.

त्यावेळी तिने नकळत पिस्तुलाचा ट्रिगर ओढला आणि गोळी सुटल्याने ती जखमी झाली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमची मदत घेत गोळीचे अवशेष व इतर साहित्य गोळा केले आहे.

उपनिरीक्षक धनू भोगाटी याने सर्व्हिस पिस्तुलाबाबत निष्काळजीपणे दाखविल्याबद्दल त्याच्याविरोधात भादंसंच्या कलम ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गौरीच्या डाव्या हाताच्या मनगटातून आरपार जाऊन डाव्या पायाच्या मांडीत घुसली. यात तिचे मनगट आणि मांडीचे हाड मोडले असून, तिच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

Goa Police
Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

सध्या गौरीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. गोमेकॉत गौरीवर उपचार सुरू असून, ती बोलू शकत नसल्याने अद्याप पोलिसांना तिचा जबाब घेता आलेला नाही.

प्रथमदर्शनी पिस्तुलामधून चुकून ही गोळी सुटल्याचे दिसते. असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

निष्काळजीपणा भोवला

सर्व्हिस पिस्तूल हे पोलिस उपनिरीक्षकाच्या सेवेतील महत्त्वाचे शस्त्र आहे. परंतु, ते इतर कुणाच्या हाती लागणार नाही, याची दक्षता घेणे संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असते.

परंतु, हे पिस्तूल पत्नीच्या हाती सहजपणे पोहचते, यात प्रथमदर्शनी उपनिरीक्षकाचा निष्काळजीपणा दिसतो, असे मत काहीजणांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jambavali Dhyan Foundation Goshala
Fake Traffic Challan Scam
 Goa Facebook Part Time Job Scam
Samuel Garvin De Braganza death case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com