Deviya Rane : आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावले उचला : आमदार दिव्या राणे

अधिवेशनात सरकारकडे मागणी
 Deviya Rane
Deviya RaneSandip Desai
Published on
Updated on

म्हादई अभयारण्यात अलीकडेच जे अग्नितांडव घडले त्यामुळे सत्तरीतील लोकाना जे त्रास झाले, या आगीमुळे जी तेथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली तशी घटना भविष्यात उद्‌भवू नये आणि तशी पुनरावृत्ती झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य व्हावे यासाठी सरकारने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी बुधवारी विधानसभेत या विषयावरील लक्षवेधी ठरावावरील चर्चेत सहभागी होऊन केली.

म्हादई अभयारण्यात लागलेली ही भीषण आग अतिशय दुर्गम अशा भागांमध्ये पसरली होती. कित्येक तास ही आग धगधगत होती. त्यामुळे ती आग विझवण्यासाठी तिथपर्यंत पोचणे यंत्रणांना खूपच कठीण होत होते.

या पार्श्वभूमीवर अशा घटना घडल्यास त्यावर नियंत्रणासाठी चॉपर स्प्रिंकलर विमाने मिळवणे गरजेचे ठरेल अशी सूचना दिव्या राणे यांनी यावेळी केली. अशी विमाने आमच्या संबंधित खात्याच्या दिमतीला असावीत असे त्या म्हणाल्या.

 Deviya Rane
Income Tax Return: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांनो सावधान, तुम्हाला भरावा लागू शकतो एवढा मोठा दंड!

दरम्यान, रेशन दुकानदारांना कमिशनचे पैसे सरकारकडून न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणणारी लक्षवेधी सूचना आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत मांडली. यावर नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी लवकरच सरकार या दुकानदारांची कमिशनची थकबाकी देईल, अशी ग्वाही दिली.

रेशन दुकानदार तोट्यात आहेत. गुदामाचे भाडे, वाहतूक खर्च, वीज दर, कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच परवडत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.

असहाय्यपणे घटना पाहिली

राणे म्हणाल्या, की या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. काहींच्या मते तापमान वाढ यामागे असावे. मात्र एक बाब खरी की असे प्रकार भविष्यात घडू नयेत. कारण तेथे आमचे लोक राहतात. ही भीषण घटना घडली त्यावेळी आम्हा सर्वांना रस्त्यावर उभे राहून असहाय्यपणे पहात राहावे लागले. वन खात्याने नंतर केंद्राची मदत घेऊन विमानातून पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 Deviya Rane
Goa Accident: उसगाव येथे धावत्या दुचाकीवर उलटला ट्रक; दोन वर्षाच्या मुलीसह दोघे जखमी

कोणत्याही भागात असे घडू नये

वन खात्याच्या कर्मचारी, अधिकारी तसेच आमच्या युवकांनी गट करून आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी जवळपास घरे असल्याने धोका होता.

मात्र, सुदैवाने जीवित हानी किंवा प्राणीहानी झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने आता यासंदर्भात तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ सत्तरीतच नव्हे तर गोव्याच्या अन्य कोणत्याही भागात असे घडू नये असे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com