Nagpur Violence: 'फडणवीस तसं बोललेच नाहीत'; 'छावा'चा नागपूर हिंसेशी संबंध जोडणाऱ्या आमदाराला गोवा मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

Goa Assembly Session 2025: नागपूरमध्ये हिंसा घडली असा 'छावा' चित्रपट गोव्यात सर्वत्र दाखवला जात आहे, असे सरदेसाई म्हणाले होते.
Devendra Fadanvis And Pramod Sawant
Devendra Fadanvis And Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: नागपूर हिंसाचाराचा मुद्दा गोवा विधानसभेत देखील समोर आला. छावा चित्रपटामुळे हिंसा घडल्याचा देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला देत आमदार विजय सरदेसाई यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वक्तव्य केले. या वक्तव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आल्याचे म्हटले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी नागपूरमध्ये हिंसाचार घडल्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. छावा चित्रपटामुळे नागपूरमध्ये हिंसा घडली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्याचा दावा सरदेसाई यांनी त्यांच्या भाषणात केला. नागपूरमध्ये हिंसा घडली असा 'छावा' चित्रपट गोव्यात सर्वत्र दाखवला जात आहे, असे सरदेसाई पुढे म्हणाले.

Devendra Fadanvis And Pramod Sawant
Goa Tourism: गोवा पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप; विरोधकांच्या प्रश्नाला पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी काय उत्तर दिले?

सरदेसाईंनी केलेला दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खोडून काढला. "सरदेसाई यांनी दावा केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य अजिबात केले नाही. मी स्वत: दोन ते तीनवेळा त्यांचे विधान ऐकले. त्यांनी कुठेच असा उल्लेख केलेला नाही. छावा चित्रपटामुळे लोकांना पहिल्यांदा खरा इतिहास कळला. खरा इतिहास लोकांना समजणे आवश्यक आहे. फडणवीसांनी हिंसा आणि छावा बाबत वक्तव्य केलेले नाही. दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत असे बोलणे योग्य नाही, तुम्ही ते वक्तव्य मागे घ्यावे", असे मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

Devendra Fadanvis And Pramod Sawant
Goa Agriculture: गोव्यात आजतागायत शेतजमिनींचं 'सर्वेक्षण' झालेलंच नाही; कृषिमंत्र्यांची धक्कादायक माहिती

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी बंदी घातलेल्या श्री राम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांनी दहा वर्षांनी गोव्यात पाऊल ठेवल्याचे सांगितले. मुतालिक यांनी गोव्यात येऊन लव्ह जिहादवर भाष्य केल्याचे सरदेसाई म्हणाले. तसेच, नागपूरमध्ये हिंसाचाराला कारणीभूत ठरलेला छावा चित्रपट गोव्यात सर्वत्र दाखवला जात आहे. हे सांगताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतील वक्तव्याचा दाखला दिला होता.

दरम्यान, मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवली जावी या मागणीने सर्वत्र जोर धरल्यानंतर नागपूरमध्ये हिंसा घडल्याचा प्रकार घडला होता. या हिंसाचारात अनेकांच्या गाड्यांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली तसेच, जाळफोळ देखील घडली. नागपूर पोलिसांनी हिंसाचाराचा मास्टमाईंड फहीम खानला अटक केली असून, याबाबत अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com