Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

Talaulim News: ..आता ही समस्या दूर होणार! वाडी - तळावलीत विकासकामांच्या पायाभरणीवेळी ढवळीकरांची ग्वाही

Talaulim Bus Shed And Lake: वाडी - तळावली गावातील बस निवारा शेड तसेच तळीच्या सौंदर्यीकरणाचे काम अशा दोन विकासकामांची पायाभरणी गुरुवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, स्थानिक सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, उपसरपंच व पंचसदस्य तसेच ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
Published on

फोंडा: वाडी - तळावली गावातील बस निवारा शेड तसेच तळीच्या सौंदर्यीकरणाचे काम अशा दोन विकासकामांची पायाभरणी गुरुवारी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, स्थानिक सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, उपसरपंच व पंचसदस्य तसेच ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.

वाडी - तळावली गावातील या दोन विकासकामांमुळे स्थानिकांना लाभदायक ठरणार असून गेला बराच काळ बस निवारा शेड नसल्याने प्रवाशांना ऊन पावसात बसची प्रतीक्षा करीत थांबावे लागायचे, पण आता ही समस्या दूर होणार आहे. शिवाय तळीच्या सौंदर्यीकरणामुळे या भागाला शोभा येणार असून गणेश विसर्जनासाठीही ते सुलभ ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Sudin Dhavalikar
स्त्रीशक्तीचा तालोत्सव! पुरुषांच्या मक्तेदारीवर सशक्त थाप देणारे गोव्यातील घुमट आरती मंडळ

वीजमंत्री ढवळीकर यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन करताना सरकारमार्फत विविध विकासकामे वाडी - तळावली पंचायतीसाठी हाती घेतली असून नियोजित काळात पंचायतघरही बांधण्यात येणार असून त्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचे नमूद केले. येथील नाल्याच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतीही बांधण्यात येणार असून त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे सुदिनढवळीकर म्हणाले.

गणपत नाईक तसेच वसुंधरा सावंत तळावलीकर यांनीही विकासकामे होत असल्याने समाधान व्यक्त करून आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यामुळे विकासाची प्रक्रिया सुरूच असल्याचे नमूद करून ढवळीकर यांचे या गावाला कायम सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com