मुरगावातील रखडलेली विकासकामे मार्गी लावणार: संकल्प आमोणकर

मुरगावात सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सहकार्याने उभारणार असल्याची ग्वाही
Sankalp Amonkar
Sankalp AmonkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sankalp Amonkar: मुरगावात सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र जनतेच्या सहकार्याने उभारणार आहे. तसेच येथील खोळंबलेली विकास कामे मार्गस्थ लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा मुरगावचे नवनिर्वाचित आमदार संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांनी दिली.

मुरगाव मतदार संघ पुन्हा एकदा काँग्रेसमय करून येथील जनतेने माझ्यासारख्या बहुजन समाजातील युवकाला आमदार बनवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली असून यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले. (Development work in Mormugao will be sorted out says Sankalp Amonkar)

Sankalp Amonkar
‘मांद्रे कॉलेज’ला मदत करणार: जीत आरोलकर

काँग्रेसचे (Congress) उमेदवार संकल्प आमोणकर विजय झाल्यामुळे त्याच्या समर्थकांनी सडा एम पी टी कॉलनीतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढली. यावेळी आमदार आमोणकर यांच्या समवेत मुरगावच्या नगरसेविका तथा श्री आमोणकर यांच्या धर्मपत्नी सौ श्रद्धा आमोणकर, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक, उमेश मांद्रेकर, नारायण मांद्रेकर, संदीप शिरोडकर, राजू परब, सुरज चोडणकर, विश्वजीत भोसले, समीर खान, सचिन भगत, प्रतीक पालेकर व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुढे बोलताना आमदार आमोणकर म्हणाले की जनतेच्या कार्याला प्रथम प्राधान्य देणार असून यात सर्व धर्मियांना एकत्रित घेऊन पक्षाचे कार्य पुढे नेणार असल्याची माहिती आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली.

याप्रसंगी मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक म्हणाले की मुरगावच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थकी ठरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच मुरगावात काँग्रेस पक्ष सुडाचे राजकारण न खेळता मुरगावात विकास करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.जनतेची सेवा करताना कोणताही भेदभाव करणार नसल्याची ग्वाही अध्यक्ष महेश नाईक यांनी दिली.सदर रॅली मुरगाव मतदार संघात सडा, जेटी,बोगदा,रूमडावाडा,देस्तेरो,बायणा भागा पर्यत्त काढून आमदार संकल्प आमोणकर यांनी आपल्या मतदारांना अभिवादन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com