‘देव बरे करू!’ गोव्याच्या आत्म्याचे संगीतमय दर्शन, खरी संस्कृती जगासमोर; उलगडला समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडील गोवा

Goan Song: ‘देव बरे करू’ हे केवळ एक गीत नसून गोवा आणि गोव्याच्या लोकांची खरी, प्रेमळ आणि पारंपरिक संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भावपूर्ण शब्दांचा, सुरांचा संगम आहे.
Goan Song
Goan SongDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘देव बरे करू’ हे केवळ एक गीत नसून गोवा आणि गोव्याच्या लोकांची खरी, प्रेमळ आणि पारंपरिक संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भावपूर्ण शब्दांचा, सुरांचा संगम आहे. या संकल्पनेचा उद्देश गोव्याचा आत्मा केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरता मर्यादित नसून त्यापलीकडील सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांमध्ये आहे, हे जगासमोर मांडणे हा आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्‍या हस्‍ते या गीताचे अनावरण करण्‍यात आले.

मिरामार येथील क्‍लब टेनिस दी गास्‍पर डायस सभागृहात हा सोहळा पार पडला. हेमा सरदेसाई, लॉरी त्रावासो, सोनिया शिरसाट, गौतमी हेदे बांबोळकर, प्रद्युम्न प्रभुदेसाई, नैशा मास्कारेन्हस, सिद्धनाथ बुयांव यांच्यासह संपूर्ण गोव्यातील एका प्रतिभावान चमूने या गीतात सहभाग घेतला आहे.

Goan Song
"Viva Carnival" Song : रंग, संगीत आणि जल्लोष! 'व्हिवा कार्निव्हल' या गाण्याने गोव्यात उसळली आनंदाची लाट

संगीत दिग्दर्शन सिद्धनाथ बुयांव यांनी केले असून कोकणी गीत साईश पै पाणंदीकर यांनी, तर इंग्रजी गीत नैशा मास्कारेन्हस यांनी लिहिले आहे. व्हिडिओ दिग्दर्शन व संपादन सतीश गावस यांनी केले आहे. ही संकल्पना विनायक प्रभू यांची आहे.

Goan Song
Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

गीताविषयी माहिती

गीत : देव बरे करू

संकल्पना : विनायक प्रभू

संगीत दिग्दर्शक : सिद्धनाथ बुयांव

कोकणी गीतकार : साईश पै पाणंदीकर

इंग्रजी गीतकार : नैशा मास्कारेन्हस

व्हिडिओ/संपादन : सतीश गावस

समर्थन : श्रीकांत बापट (लॅब इंडिया)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com