Desterro Waddo Footpath : पदपथाच्या कामामुळे पादचाऱ्यांना धोका! काम बंद पाडण्याचा नझीर खान यांचा इशारा

देस्तरोवाडो ते बायणा रवींद्र भवन दरम्यान खंदकावर पेव्हर्स घालून पदपथ तयार करताना कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी बाळगली नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांनी व्यक्त केले.
Road Condition in Goa | Desterro Waddo Footpath
Road Condition in Goa | Desterro Waddo FootpathDainik Gomantak

देस्तरोवाडो ते बायणा रवींद्र भवन दरम्यान खंदकावर पेव्हर्स घालून पदपथ तयार करताना कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी बाळगली नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नझीर खान यांनी व्यक्त केले.

याप्रकरणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व संबंधित अधिकारी वर्गाने पाहणी करून तेथील धोकादायक गोष्टी दूर कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली. विनंती मान्य न झाल्यास आम्ही तेथील काम बंद पाडण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Road Condition in Goa | Desterro Waddo Footpath
Mahadayi Water Dispute: म्हादईच्या रक्षणासाठी मांद्रेत हजारो घरांमध्ये होणार कलशपूजन

नझीर खान म्हणाले की, सडा से बायणा रस्त्याचे बळकटीपणा, रुंदीकरण, हॉटमिक्स, रस्त्यालगत पदपथ, सर्व वाहिन्यांसाठी खंदक वगैरे कामांसाठी 2014 मध्ये माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या कामांना मान्यता मिळाली होती. तथापि, काही कारणास्तव कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.

आता गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने ती कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू करून बहुतांश कामे केली आहेत. मात्र देस्तरोवाडो ते रवींद्र भवन नजीकच्या खंदक, पदपथचे काम पादचाऱ्यांना धोकादायक ठरण्याची भीती आहे.

वीज इतर वाहिन्या रस्त्याकडेच्या या खंदकातून नेण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणचे वीज खांब तेथून काढण्यात न आल्याने तेथे खंदकाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही.

कंत्राटदाराने मुरगाव पालिका व वीज खात्याच्या अधिकारी वर्गाला वीज खांबे तेथून हलविण्यासंबंधी सतत निवेदने दिली. परंतु, त्या निवेदनांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपले काम सुरू ठेवताना वीज खांबाजवळचे बांधकाम न करता इतर बांधकाम केले.

आता त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहे. पदपथ तयार झाल्याने पादचारी या पदपथावरून चालत गेल्यास ते खंदकात पडून जखमी होण्याची शक्यता आहे. याकामी स्थानिक आमदाराने दखल घेण्याची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com