Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला जामीन पण फातर्पात 'नो एन्ट्री'

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: केपे न्यायालयाने श्रेया आणि नमिताला जामीन देताना फातर्पात प्रवेशास बंदी घातली आहे.
श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकर
श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरDainik Gomantak

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान व महाजनांसंदर्भात समाज माध्यमांत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याच्या आरोपात अटकेत असणाऱ्या श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्फेकरला जामीन मंजूर झाला आहे. पण, दोघींना फातर्पा येथे प्रवेशास बंदी घालण्यात आलीय.

केपे प्रथमवर्ग न्यायालयात याबाबत आज (दि. 22 मे) झालेल्या सुनावणीत श्रेया धारगळकर आणि नमिता फातर्फेकरला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.

दोघींना पुढील एक महिना कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात हजेर लावणे बंधनकारक असून. पुढील आदेशापर्यंत त्यांना फातर्पा येथे प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

न्यायालयाने सोमवारी दोघींना चार दिवासांची पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, अचानक श्रेयाच्या पोटात दुखू लागल्याने दिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकर
Three Linear Project: इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर तमनार समाविष्ठ तीन रेखीय प्रकल्प रद्द करणार - अमरनाथ पणजीकर

श्रेयाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण भक्तांनी श्रेयाच्या अटकेची मागणी लावून धरली होती. संतप्त भाविकांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्‍यावर मोर्चा घेऊन जात मोठा गोंधळ घातला. अखेर अटकेच्या आश्वसनानंतर जमाव शांत झाला.

श्रेयाने देखील या सर्व प्रकारानंतर सर्वांची माफी मागितली. दरम्यान, कुंकळ्ळी पोलिसांनी श्रेया आणि नमिता यांना अटक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com