Book Publication : रामदास केळकर यांच्‍या दोन पुस्‍तकांचे प्रकाशन

कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक सर्वोत्तम सातार्डेकर यांच्‍या हस्‍ते प्रकाशन झाले.
Book Publication Sonia's Days'
Book Publication Sonia's Days' Dainik Gomantak
Published on
Updated on

Book Publication : पणजी, गेली अनेक वर्षे करिअर मार्गदर्शक व साहित्‍यिक म्‍हणून परिचित असलेल्‍या प्राध्‍यापक रामदास केळकर यांच्‍या ‘सोनियाचे दिवस’ व ‘करिअर प्रेरणा’ या दोन पुस्‍तकांचे आज पणजी येथे कला व संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक सर्वोत्तम सातार्डेकर यांच्‍या हस्‍ते प्रकाशन झाले.

या प्रसंगी प्रा. केळकर यांच्‍यासह ‘वर्षा बूक स्‍टॉल’चे वामन भाटे, शशिकांत सरदेसाई व प्रकाशक वैभव फोंडेकर उपस्‍थित होते. केळकर यांची ३२ पुस्‍तके असून, त्‍यापैकी करिअर या विषयावर नुकतेच बारावे पुस्‍तक प्रसिद्ध झाले.

तंत्रज्ञानाच्‍या लाटेवर स्‍वार झालेल्‍या आधुनिक काळात करिअरच्‍या नव्‍या संधी तरुणांना साद घालत आहेत. तसेच उत्तम ‘करिअर’ घडविण्‍यासाठी मनी ध्‍येय बाळगणे आवश्‍‍यक असते. ‘करिअर प्रेरणा’ पुस्‍तकात अशा अनेक पैलूंचा सुरेख मेळ घालण्‍यात आलेला आहे.

Book Publication Sonia's Days'
Social Security Schemes : अर्थ मंत्रालयातर्फे बँकांसाठी अॅडव्हायजरी जारी; सरकारी योजनांच्या लक्ष्याबाबत विचारले प्रश्न!

त्‍याला शशिकांत सरदेसाई यांची प्रस्‍तावना लाभली आहे; तर ‘सोनियाचे दिवस’ हे ललित संग्रहांचे पुस्तक आहे. बदलणारे सामाजिक आयाम आणि त्‍याच्‍या उदरातील हृदयस्पर्शी आठवणींचा कोलाज वरील पुस्‍तकात चितारण्‍यात आला असून, त्याला नीलेश करंदीकर यांची प्रस्‍तावना लाभली आहे.

या प्रसंगी सातार्डेकर यांनी लेखक म्‍हणून प्रा. केळकर यांच्‍या सामाजिक जाणिवेची प्रशंसा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com