सासष्टी: संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मारुती मंदिर ट्रस्ट व छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी मडगावचे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी आज संयुक्त बैठक बोलावली.
दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे यावेळी मांडले. मारुती मंदिर ट्रस्ट तर्फे प्रेमींना एक प्रस्ताव दिला आहे. याबद्दल विचार करण्यासाठी संभाजी महाराज प्रेमींना सांगितले असून पुढील बैठकीत या संदर्भात तोडगा निघेल,असे उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी सांगितले.
मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक यांनी सांगितले की, संभाजीराजांच्या पुतळ्याला हरकत नाही. पुतळा मंदिरासमोरील स्तंभाजवळ आहे. त्यामुळे पालखी प्रदक्षिणा काढता येत नाही. हा पुतळा थोडा हलवावा त्यामुळे पालखी प्रदक्षणा सुलभ होईल, असे निदर्शनास आणले आहे. या वेळी मंदिर ट्रस्टचे जगदिश शिरवईकर उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.