'कसिनो रद्द होईपर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी उपोषण करावे'

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी आमरण उपोषण करावे अशी जोरदार मागणी मिशन फॉर लोकलने (Mission for Local) पेडणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत 10 रोजी केले.
Rajan Korgaonkar
Rajan KorgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: धारगळ येथे होऊ घातलेल्या कसिनोला जागृत नागरिकांनी विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा स्वाभिमानी पेडणेकरांनी जो निर्णय 9 रोजी बैठकीत घेतला त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. आता जोपर्यंत कसिनो रद्द होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी आमरण उपोषण करावे अशी जोरदार मागणी मिशन फॉर लोकलने (Mission for Local) पेडणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत 10 रोजी केले. यावेळी मिशन फॉर लोकलचे नेते राजन कोरगावकर (Rajan Korgaonkar), माजी सरपंच राजू नर्स व पंच राकेश स्वार आदी उपस्थित होते.

राजन कोरगावकर

मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी बोलताना वैभवशाली पेडणे महालाला एक इतिहास आहे, एक संस्कृती आहे नद्या नाले ,वृक्षवल्ली ,मंदिरे ,राजवाडे स्मारक अशी ऐतिहासिक स्थळं आहेत ही आमच्या पेडणेकरांची ओळख आहे.पेडणे तालुक्यात कोणत्याही स्थितीत केसिनोला पेंडण्यात थारा दिला जाणार जाईल असा इशारा राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. स्वाभिमानी पेडणेतील जागृत नागरिक एकत्रित येऊन केसिनो विरोधी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असणार आहे ,केसिनो ही आमच्या पेडणेवासीयांची संस्कृती नाही केसिनोला आम्ही सुरुवातीपासून विरोध दाखवला, तो यापुढेही कायम राहणार असल्याचे राजन कोरगावकर यांनी सांगितले. पेडणेत वीज पाणी रस्ते बेरोजगारी ही समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी संघटित होऊन भविष्यात कोणत्याही स्थितीत केसिनोला थारा नको असे राजन कोरगावकर म्हणाले.

Rajan Korgaonkar
'मगो उमेदवारांच्या पळवापळीचा आरोप बिनबुडाचा': भाजप प्रदेशाध्यक्ष

केसिनोची संस्कृती काय असते यांची माहिती आणि काय होतंय ते पणजीच्या तिथल्या लोकांना माहीत आहे पेडण्यात केसिनो आला तर आमची संस्कृती धोक्यात येईल शिवाय महिला युवती सुरक्षित राहणार नाही त्यासाठी संघटित होऊन कडाडून विरोध करूया असे राजन कोरगावकर म्हणाले.

राजू नर्स

कोरगाव माजी सरपंच राजू नर्स यांनी बोलताना आता या भागाचे 20 वर्षे लोकप्रतिनिधी बाबू आजगावर मंत्री म्हणून कार्यरत आहे त्यांनी आता या केसिनो विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी ,शिवाय केसिनो रद्द होईपर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा ,केवळ तुमचा नोकर आणि सेवक म्हणून भाषणे करण्यापूर्वी आता पेडणेकरावर केसिनोच्या माध्यमातून जे संकट आले ते संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करावे ,आता स्वाभिमानी पेडणेकर स्थानिक उमेदवारालाच आमदार करतील असा विश्वास व्यक्त केला.

Rajan Korgaonkar
आम आदमी पक्षाने  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर 'आप'ला भाजपाची बी टीम असल्याचा खोटा आरोप केला

राकेश स्वार

पंच राकेश स्वार यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कोणत्या पंचायत क्षेत्राचा विकास केला हे त्यांना माहीत आहे पोरसकडे न्हायबागपंचायतीचा कोणताच विकास केला नसल्याचा दावा करून आता नोकऱ्याचे आमिषे दाखवून आता मते मिळणार नाही ,त्यासाठी अगोदर केसिनोची संकट बाबू आजगावकर यांनी दूर करावे अशी मागणी केली आहे. पोरासकडे येथील सतीया देवीच्या परिसराचा विकास करण्याचे आश्वासन आणि पूर्वीचा सभागृह त्या ठिकाणी नवीन पंचायत सभागृहाचे काय झाले असा सवाल स्वार यांनी उपस्थित केला आहे.

धारगळवासीयांचे आभार

धारगळ वासीयांची सुरुवातीला या केसिनोला विरोध करून जनजागृती केली त्याबदल आणि आताच भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मिशन फॉर लोकलच्या उपक्रमाला पाठिंबा दिल्याने आम्ही त्यांचे अभिनंदन करतो असे राजन कोरगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com