फोंड्यात डेंग्यू आटोक्यात; आरोग्य खात्याच्या प्रयत्नाला यश

आरोग्य खात्याने दिली माहिती
Dengue
DengueDainik Gomantak

फोंडा: फोंड्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या नियंत्रणात असून गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात विविध ठिकाणी चाळीसपेक्षा जास्त डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. सध्या आरोग्य खात्याने विविध ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्याने डेंग्यू रुग्ण संख्या आटोक्यात असल्याची माहिती फोंड्यातील स्वच्छता निरीक्षकांनी दिली. राज्यात डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने तापसरीचे प्रकार विविध ठिकाणी सुरू आहे. मात्र त्यातील काही डेंग्यूसदृष्य असल्याचेही निदर्शनास आले होते. नेमका हाच प्रकार फोंडा तालुक्यातही घडला आहे. (Dengue under control in Fonda; Success to health department efforts)

फोंडा शहर परिसरात पाच डेंग्यू रुग्ण सापडले होते, मात्र हा आकडा वाढलेला नाही, त्यामुळे आरोग्य खात्याला दिलासा मिळाला आहे. मात्र तालुक्यातील दत्तगड - बेतोड्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण सापडल्याने धोका निर्माण झाला होता. पण हे सगळे रुग्ण बरे झाले आहेत, मात्र रुग्ण संख्या एक दोन अशी सापडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Dengue
कुडासे बंधाऱ्यात बुडालेल्या तनिशावर अंत्यसंस्कार; नेत्यांनी केले सांत्वन

बेतोडा पंचायत मंडळाने आरोग्य खात्याने आवश्‍यक त्या ठिकाणी फॉगिंग व इतर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कुर्टी पंचायतीचे सरपंच दादी नाईक तसेच फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य खात्याने फॉगिंग व इतर उपाय करण्याची मागणी केली होती, त्यानुसार कार्यवाही होत असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेतोडा-दत्तगड भागात वाढली होती रुग्‍णांची संख्या

फोंडा तालुक्यात डेग्यू रुग्णांचा आकडा वाढला होता. 23 मे रोजी बेतोडा-दत्तगड भागात रुग्‍णांची संख्या जास्‍त होती त्‍यामुळे चिंता व्‍यक्त करण्‍यात येत होती. गेल्या दोन महिन्यांपासून फोंडा तालुक्यात 38 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. हा आकडा चाळीशीच्या पार जाण्याचा धोका व्यक्त करण्यात येत होता. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी फोंडा आरोग्य खात्यातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. फोंडा पालिकेच्या सहकार्याने शहर तसेच इतर भागात या उपाययोजना प्रभावी करण्यासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष तसेच पालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com