Dengue Cases Rise
Dengue Cases RiseDainik Gomantak

Dengue Cases in Goa: गोव्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ! सर्वाधिक रुग्ण उत्तर गोव्यात

राज्यात डेंग्यूचे एकूण 303 रुग्ण आढळून आले आहेत
Published on

Dengue Cases in Goa: या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात डेंग्यूचे एकूण 303 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत 309 प्रकरणे नोंदवली गेली होती. उत्तर गोव्यात डॉक्टर अशा प्रकारच्या विषाणूजन्य संसर्गाच्या अनेक रुग्णांची काळजी घेत आहेत. यामध्ये शेजारील राज्यांतील स्थलांतरितांमुळे संसर्ग वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dengue Cases Rise
Crime News : स्वच्छतागृहाच्या वापरावरून पुण्यातील पर्यटकास मारहाण

आरोग्य सेवा संचालनालयाच्या राष्ट्रीय वेक्टर-बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP) सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये उत्तर गोव्यात 100 तर दक्षिण गोवा जिल्ह्यात डेंग्यूची 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

तर दुसरीकडे दक्षिण गोव्यात, वास्कोमध्ये 5, मडगाव, काणकोण आणि लोटलीमध्ये प्रत्येकी 2 कुठ्ठाळी आणि नावेलीमध्ये प्रत्येकी 1 प्रकरण नोंदवली गेली आहेत.

उत्तर गोवा जिल्ह्यात पणजीमध्ये 3, म्हापसामध्ये 28, पेडणेमध्ये 6, कांदोळीमध्ये 8, हळदोणामध्ये 5, डिचोलीमध्ये 5, वाळपईमध्ये 2, कासारवर्णेमध्ये 4, शिवोलीमध्ये 5, कोलवाळमध्ये 7, साखळीमध्ये 9 प्रकरणे तर पर्वरीमध्ये 4, मयेमध्ये 3, चिंबलमध्ये 2 आणि साळगावमध्ये 9 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलनुसार, डेंग्यूच्या संशयित रुग्णांमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तरी राज्यातील डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com