पणजी, मडगाव येथे होणार मतदान यंत्रांची प्रात्यक्षिके

गोवा विधानसभेच्या 2022 सालच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न
Demonstration of voting machines will be held at Panaji, Margao
Demonstration of voting machines will be held at Panaji, Margao
Published on
Updated on

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानासाठी लोकांना प्रवृत्त केले जाणार असून विविध बाबींची मदत घेतली जात असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली. नव्या एम-3 निवडणूक यंत्रांची प्राथमिक स्तरावर तपासणी (FCLU) करण्यात आली. येत्या 26 ऑक्टोबरला उत्तर गोव्यासाठी पणजीमध्ये आणि दक्षिण गोव्यासाठी मडगाव येथे सर्वांसाठी मतदान यंत्रांची तपासणी आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे..

विधानसभेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये उत्तर गोव्यात 83.33 तर दक्षिण गोव्यात 79.32 टक्के मतदान झाले होते. तर एकूण मतदानाची टक्केवारी 81.27 टक्के होती. उत्तर गोव्यातला सर्वात कमी मतदान पणजी मतदारसंघात 77.6 टक्के तर दक्षिण गोव्यात वास्कोत 72.44 टक्के मतदान झाले होते, तर सासष्टी आणि मुरगाव तालुक्यामध्ये सर्वात कमी मतदान झाले होते. ही मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू असून सर्व मतदारांपर्यंत आयोग जाणार आहे. यासाठी समाजातील विविध स्तरातील नागरिकांची मदत घेण्यात येत आहे

Demonstration of voting machines will be held at Panaji, Margao
Goa: साखळीमध्ये भाजपची दांडगाई

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतिनिधी अनुपस्थित

आज राजकीय पक्षांसाठी नव्या यंत्रांची ओळख करून देण्यात आली. त्यात भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोपचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, या यंत्रांना आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. निवडणूक आयोगाकडून यावेळी फोटोसह ओळखपत्र स्पीड पोस्टाने प्रत्येक मतदाराच्या घरी पाठविण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या वतीने मतदान यंत्रे बनवली असून गोव्यात प्रथमच एम-3 ही मतदान यंत्रणा आणण्यात आली आहे. विशिष्ट प्रकारच्या तपासणी यंत्राद्वारे अधिक काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे. मशीन हॅक करणे, मशीन बंद पडणे यासारखे प्रकार यापुढे होणार नाहीत.

- आर्शिया खातून, अभियंता, बीईएल

Demonstration of voting machines will be held at Panaji, Margao
"मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक"

विधानसभेच्या 2022 सालच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2017 सालच्या निवडणुकीत कुठ्ठाळी मतदारसंघातील झुवारीनगर बुथवर 25.60 टक्के तर वास्को मतदारसंघातील वरणापुरी बुथवर 29.6 टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्तीत जास्त मतदान करण्यावर आमचा भर आहे.

- कुणाल, मुख्य निवडणूक अधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com